उद्याच करून घ्या बँकेची कामे, संपाआधी SBI, MahaBank ने दिला सल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि बँक ऑफ महाराष्ट्रने पुढच्या आठवड्यातील बँक संप लक्षात घेता ग्राहकांना अ‍डव्हान्समध्ये पैसे काढण्यास आणि बँक व्यवहार करण्याचा सल्ला दिला आहे.

4 दिवस बंद राहतील बँका
सरकारी बँकांच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ देशभरातील बँक कर्मचाऱ्यांनी पुढील आठवड्यात, 15 आणि 16 मार्च रोजी संपाची घोषणा केली आहे. या संपामुळे बँका सलग 4 दिवस बंद राहणार आहेत. कारण म्हणजे 14 मार्च रविवार असेल तर 13 मार्च रोजी महिन्याचा दुसरा शनिवार असेल. या दोन्ही दिवस बँका बंद राहतील. बँँका कामकाज योग्य ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

एसबीआय आणि बँक ऑफ महाराष्ट्रने म्हटले की, बँकिंग सेवा संपाच्या परिणामापासून दूर ठेवण्यासाठी ते पावले उचलत आहेत. या संपांमुळे झालेल्या नुकसानीचे आकलन अद्याप करू शकत नाही, असे दोन्ही बँकांनी सांगितले.

प्रभावित होऊ शकते बँक सेवा
शेअर बाजाराला देण्यात आलेल्या माहितीत एसबीआयने म्हटले की, बँकांकडून संप झाल्यास शाखांच्या कामकाजावर फारसा परिणाम होणार नाही. आपला प्रभाव कमी करण्यासाठी आणि ग्राहकांना सामान्य बँकिंग सेवा देण्यासाठी बँक प्रयत्न करीत आहे. बँकांच्या खासगीकरणाच्या निषेधार्थ भारतीय कर्मचारी संघटना (आयबीए) आणि युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (यूबीएफयू) या बँक कर्मचार्‍यांच्या संघटनेने हा संप पुकारला आहे.

बजेटमध्ये बँकांच्या खासगीकरणाची करण्यात आली घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात दोन सरकारी बँक आणि एक सामान्य विमा कंपनीचे खासगीकरण जाहीर केले होते. त्या म्हणाल्या की यासाठी विधिमंडळात सुधारणा करणे आवश्यक आहे, त्यासाठी ते अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रस्ताव आणतील.