नो-टेन्शन ! बँक कर्मचाऱ्यांचा 2 दिवसांचा संप मागे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या 26 आणि 27 सप्टेंबर रोजीचा संप अखेर मागे घेण्याची घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या बळकटीकरणासाठी केंद्र सरकारने त्यांच्या विलीनीकरणाच्या निर्णयाविरुद्ध कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले होते. परंतु बँक कर्मचारी संघटनेचे नेते आणि अर्थसचिव राजीव कुमार यांच्यात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे.

१० बँकांचे विलीनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ४ कामगार संघटनांनी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर कॉंग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायझेशन बँक ऑफिसर यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. बँकिंग क्षेत्रातील विविध कामगार संघटना सरकारच्या या निर्णयाला विरोध करीत आहेत. संघटनांचे म्हणणे आहे की असे केल्यास हजारो रोजगार गमावल्यास, नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (NPA) देखील वाढतील.

बँक कर्मचारी 25 मध्यरात्री ते 27 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बँक कर्मचारी संपावर जाणार होते. संपानंतर चौथा शनिवार, रविवार आणि 30 तारखेला अर्धवार्षीक असल्याने बँका सलग 5 दिवस बंद राहणार होत्या. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागणार होता. मात्र, आता बँक कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याने सणासुदीच्या काळात नागरिकांना पैशांची चडचण भासणार नाही.

Visit : policenama.com