उद्यापर्यंत उरकून घ्या बँके संदर्भातील महत्वाची कामे ! 8 जानेवारीला बँकांचा संप, कामकाजावर होणार परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुमचे बँकेसंबंधित काही महत्वाची कामे करणे राहून गेले असेल तर ते तात्काळ उरकून घ्या. कारण 8 जानेवारी (बुधवार) पासून देशातील विविध बँका संपावर जाणार आहेत. या संपामुळे बँकांच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे तुमची कामे अडून राहू शकतील.

याशिवाय एसबीआय आणि सिंडिकेट बँकने शेअर बाजारला याची माहिती दिली आहे. एसबीआयने सांगितले आहे की संपात सहभागी होणाऱ्या यूनियनमध्ये आमच्या बॅंक कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, यामुळे संपाचा कामकाजावर तसा कमी परिणाम होईल.

तर सरकारी बँक असलेल्या सिंडिकेट बँकेने सांगितले की संपाचा विचार करता ते बँकेचे दैनंदिन कामकाज सामान्य ठेवण्यासाठी प्रयत्न करतील. सिंडिकेट बँकेच्या मते शाखा आणि कार्यालयावर संपाचा परिणाम होऊ शकतो.

10 केंद्रीय कामगार संघटनांनी केंद्र सरकारवर कामगार विरोधी धोरणांना प्रोस्ताहन दिल्याचा आरोप केला आहे. याचा विचार करता 8 जानेवारीपासून देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. या संपामध्ये ऑल इंडिया एम्पलॉइज असोसिएशन, बँक एम्पलॉइज फेडरेशन ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल बँक एम्पलॉइज फेडरेशन आणि इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेसचा समावेश आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/