Bank Strike from 31 Jan : सलग 3 दिवस बँका राहणार बंद, पगार मिळण्यास उशीर अन् ‘या’ गोष्टींवर परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 31 जानेवारीपासून दोन दिवसांच्या संपाचे आवाहन केले आहे. युएफबीयु हे नऊ ट्रेड युनियनन्सचे प्रतिनिधीत्व करते. वृत्त संस्थांच्या माहितीनुसार संघटनेने 11 मार्चपासून सुद्धा तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली आहे. त्यांनी म्हटले की यानंतरही मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 1 एप्रिल 2020 पासून बँक कर्मचारी बेमुदत संपावर जातील. बँक युनियन्सची तीन टप्प्यात संप करण्याची योजना आहे.

युएफबीयुचे संयोजक संजीव कुमार बंदलिश यांच्या माहितीनुसार, इंडियन बँक्स असोसिएशनचे चेअरमन, अर्थसेवा विभागाचे सचिव आणि कामगार मंत्रालयाच्या मुख्य कामगार आयुक्तांना संपाबाबत प्रथम पत्र पाठविण्यात आले आहे. वेतनात दुरूस्ती, बँकिंग सिस्टम पाच दिवसांची करणे, विशेष भत्ता मुळवेतनात समाविष्ठ करणे, नवी पेन्शन योजना रद्द करणे, आदी मागण्या प्रलंबित असल्याने संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे संजीव कुमार बंदलिश यांनी म्हटले आहे.

पगाराला होणार उशीर
जर हा संप झाला तर देशातील मोठ्या लोकसंख्येला यावेळी उशिराने पगार मिळू शकतो. कारण, बहुतांश विभागात आणि कंपन्यांमध्ये महिन्याच्या शेवटच्या दिवशी किंवा महिन्याच्या पहिल्या दिवशी पगार दिले जातात. यावेळेला 31 जानेवारीला शुक्रवार आहे, 1 फेब्रुवारीला शनिवारी आणि 2 फेबुवारीला रविवार आहे. यामुळे पगार मिळण्यास उशीर होऊ शकतो. यामध्ये ईएमआय पेमेंट, क्रेडिट कार्ड पेमेंट यासारख्या अर्थ योजनांवर परिणाम होऊ शकतो. ज्यांना चेकद्वारे पगार मिळतो, त्यांना अडचण येऊ शकते. कारण तीन दिवस लागोपाठ बँका बंद असल्याने चेक क्लियर होण्यास बराच कालावधी लागू शकतो.

8 जानेवारीला भारत बंदमध्ये घेतला होता सहभाग
बँक कर्मचार्‍यांनी केंद्रीय ट्रेड युनियन्सने 8 जानेवारीला पुकारलेल्या भारत बंदमध्ये सुद्धा आपल्या मागण्यांसाठी सहभाग घेतला होता.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

 

You might also like