22 ऑक्टोबरला बँकांमध्ये संप, SBI-BoB नं ग्राहकांना सांगितली ‘ही’ बाब

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दहा बँकेच्या विलीनीकरणाची घोषणा केल्यानंतर आता दोन बँक युनियनने 22 ऑक्टोबर रोजी एकदिवसीय संपाची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक बँकांच्या दैनंदिन व्यवहारामध्ये अडथळॆ येणार असून बँक ऑफ बडोदाने आपल्या ग्राहकांना यासंदर्भात सूचित केले आहे.

याचबरोबर या संपाच्या काळात बँकेचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी विविध प्रकारची पावले उचलली असल्याची माहिती देखील बँकेने दिली आहे. देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने मात्र याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे. बँकेत अनेक कर्मचारी असल्याने कामाचा कोणताही ताण येणार नसून ग्राहकांना योग्य सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. तसेच बँक ऑफ महाराष्ट्र्ने देखील कोणताही अडथळा होणार नसल्याचे म्हटले आहे. 22 ऑक्टोबर बरोबरच 26 तारखेला देखील बँक बंद राहील. त्यानंतर रविवारपासून 29 तारखेपर्यंत अनेक बँकांना सुट्ट्या असणार आहेत.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केल्यानुसार आंध्रा बँक, अलाहाबाद बँक, सिंडिकेट बँक, कॉर्पोरेशन बँक, यूनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स यांचे विलीनीकरण होणार आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी