Bank Closed : आजच करा ‘कॅश’ची व्यवस्था, सलग 3 दिवस बँका बंद

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुन्हा एकदा बँका तीन दिवस लागोपाठ बंद राहणार आहेत. यामुळे आजच तुम्ही पैशांची व्यवस्था करून ठेवा, अन्यथा पुढील तीन दिवस अनेक समस्या भेडसावू शकतात. 21 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारीपर्यंत देशभरातील बँका बंद राहणार आहेत. उद्या म्हणजे शुक्रवारी महाशिवरात्रीची सुट्टी असल्याने बँकांचे कामकाज होणार नाही. तर, दुसर्‍या दिवशी म्हणजे 22 फेब्रुवारीला महिन्यातील चौथा शनिवार आहे. यानंतर 23 फेब्रुवारीला रविवारची सुट्टी असल्याने लागोपाठ बँका बंद राहणार आहेत. बँका बंद राहिल्याने चेक क्लियरन्स, एनईएफटी, आरटीजीएस इत्यादी कामांवर परिणाम होणार आहे. आता बँका 24 फेब्रुवारी म्हणजे सोमवारी उघडणार आहेत.

यापूर्वीही बँका तीन दिवस बंद होत्या
यापूर्वी 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत बँका बंद होत्या. बँक यूनियनन्सने 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारीपर्यंत देशव्यापी संपाचे आवाहन केले होते. तर 2 फेब्रुवारीला रविवार असल्याने बँकांना सुट्टी होती.

मार्चमध्ये लागोपाठ 5 दिवस बँका बंद
पुढील महिन्यात म्हणजे मार्च महिन्यात लागोपाठ 5 दिवस बँका बंद राहू शकतात. सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी 11 ते 13 मार्चपर्यंत संपावर जाऊ शकतात. जर 11-13 मार्चला बँक कर्मचारी संपावर गेले तर लागोपाठ 5 दिवस बँक बंद राहतील. कारण तीन दिवसाच्या संपानंतर 14 मार्चला महिन्याचा दुसरा शनिवारी आणि त्यानंतर रविवारची सुट्टी आहे, म्हणजे संप झाला तर बँकांच्या कामाकाजावर 5 दिवस परिणाम होणार आहे.

मार्चमध्ये एकुण 16 दिवस बँका राहणार बंद
मार्चमध्ये सुट्ट्यांचा विचार केल्यास आरबीआयनुसार या महीन्यात बँकांना 6 सुट्ट्या आहेत. याशिवाय दुसरा आणि चौथा शनिवार मिळून एकुण 8 दिवस बँका बंद राहतील. तर, 5 रविवार यात धरल्यास मार्चमध्ये एकुण 13 दिवस बँका बंद राहतील. जर संप झाला तर एकुण 16 दिवस बँका बंद राहतील.