Coronavirus Impact : बँकेतील कामे लवकरात लवकर उरका, कामकाजाच्या वेळा घटण्याची शक्यता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे जगभरातील अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील वाईट परिणाम होत आहे. देशाची अर्थव्यवस्था ढासळू लागली आहे. कोलमडणारी अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आणि देशातील कंपन्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून लवकरच मोठं पाऊल उचललं जाणार आहे. एका वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार लवकरच बँकांच्या कामकाजाची वेळ कमी करण्यात येणार आहे म्हणजेच सामान्यांसाठी बँकेची वेळ कमी करण्यात येणार आहे.

NPA चे नियम व अटी शिथिल
देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनामुळे प्रभावित क्षेत्रांसाठी NPA चे नियम व अटी शिथिल करण्यात येण्याची शक्यता आहे. यासाठी 30 ते 60 दिवसांचा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे. या प्रस्तावावर सरकार आणि आरबीआयमध्ये चर्चा सुरु आहे.

कामकाजाची वेळ कमी होण्याची शक्यता
अर्थ मंत्रालयाने बँकांना Business Continuity Plan बनवण्यास सांगितले आहे. अती महत्त्वाच्या कामासाठी बँकांची वेगळी टीम बनवण्याची शक्यता आहे. कामकाजाची वेळ मुख्यत: कमी होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे NPA मध्ये शिथिलता मिळण्याबाबात अर्थ मंत्रालयाच्या बँकिंग डिपार्टमेंटने प्रस्ताव मांडला आहे. अर्थ मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयामध्ये यावर एकमत झाले आहे. सर्वप्रथम एमएसएमई, ऑटो, टूर अँड ट्रॅव्हल्स, हॉटेल्सचा विचार करण्यात येणार आहे. एनपीएचा कालावधी वाढवण्यात येणार आहे या मागचे कारण अनेक कंपन्यांकडून पेमेंट करण्यास उशीर होत आहे.