बँकतील नोकरदारांसाठी मिळू शकते खुशखबरी ! आठवडयात काम फक्त 5 दिवस आणि पगार देखील वाढणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची गोष्ट आहे कारण बँक कर्मचाऱ्यांना लवकरच आठवड्याला 5 दिवस काम करावे लागेल आणि दर शनिवारी, रविवारी बँकांना सुट्टी असेल. सध्या प्रत्येक रविवारशिवाय दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. याशिवाय बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात 15 टक्क्यांनी वाढ होणार आहे. तसेच फॅमिली पेंशनमध्ये देखील वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कर्मचाऱ्यांना एरियर देखील देण्यात येईल.

लवकर होणार बैठक 
अर्थ मंत्रालयाने बँक कर्मचाऱ्यांच्या आधिकाधिक मागण्या मान्य करण्यास सहमती दर्शवली आहे. इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) ला देखील निर्देश दिले आहेत की त्यांनी एका महिन्यात बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंबंधित त्यांच्याशी चर्चा करतील आणि यावर उपाय सुचवण्यात येतील. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात बँक यूनियनची आयबीए बरोबर बैठक पार पडण्याची शक्यता आहे. या बैठकीत मागण्यावर सहमती दर्शवून नोव्हेंबरच्या अंती त्याच्या घोषणेची शक्यता आहे.

वेतनामान वाढण्याची शक्यता 
बँक कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत की बँकेचे कामकाज आठवड्यात 5 दिवस असावे आणि पगारात 25 टक्क्यांनी वाढ करण्यात यावी. आता बँक यूनियनला देखील या बाबीची माहिती आहे की 25 टक्के पगार वाढीवर मान्यता मिळणार नाही. या कारणाने आता 15 टक्के पगारवाढ मिळावी अशी मागणी सुरु झाली आहे. बँक कर्मचाऱ्यांना विश्वास आहे की सरकार त्यांची दुसरी मागणी मान्य करुन सध्याच्या परिस्थिती पगारवाढीवर काहीतरी तोडगा निघेल.

Visit : Policenama.com