Banking Cheque Rule | SBI, PNB, BoB आणि BOI च्या ग्राहकांनी लक्ष द्यावे ! चेक पेमेंट करण्यापूर्वी जाणून घ्या ‘हे’ नियम
नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Banking Cheque Rule | जर तुम्ही चेकने पेमेंट (Cheque Payment Rules) करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. गेल्या वर्षी 1 जानेवारी 2021 पासून रिझर्व्ह बँकेने (RBI) पॉझिटिव्ह पे सिस्टीम Positive Pay System (PPS) लागू केली होती. रिझर्व्ह बँकेने बँकिंग फसवणूक टाळण्यासाठी 2020 मध्ये धनादेशांसाठी ’पॉझिटिव्ह पे सिस्टीम’ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. (Banking Cheque Rule)
ज्यासाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंटसाठी काही महत्त्वाच्या तपशीलांची आवश्यकता असू शकते. आता हळूहळू सर्व बँका त्यांच्या सोयीनुसार त्याची अंमलबजावणी करत आहेत. आता उद्या 4 एप्रिलपासून पंजाब नॅशनल बँक Punjab National Bank (PNB) पॉझिटिव्ह पे सिस्टीम (PPS) नियम लागू करणार आहे.
पीएनबीने म्हटले आहे की 4 एप्रिल 2022 पासून, पॉझिटिव्ह पे सिस्टीम अनिवार्य असेल. जर ग्राहकांनी बँकेच्या शाखेतून किंवा डिजिटल चॅनलद्वारे रू. 10 लाख आणि त्याहून अधिक रकमेचा चेक जारी केला तर पॉझिटिव्ह पे सिस्टीम कन्फर्मेशन अनिवार्य असेल. ग्राहकांना खाते क्रमांक, चेक क्रमांक, चेक अल्फा, चेकची तारीख, धनादेशाची रक्कम आणि लाभार्थीचे नाव देणे आवश्यक आहे. (Banking Cheque Rule)
—
SBI, BoB सह बँकांमध्ये लागू आहे नियम
यापूर्वी SBI, BoB, BOI, Axis Bank, HDFC बँक, ICICI बँक आणि इतर बँकांनी ही सिस्टम अनिवार्य केली आहे. कोणत्या बँकेत किती रूपयांच्या चेकवर पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली आहे ते जाणून घेऊया…
1. State Bank Of India (SBI) :
स्टेट बँक ऑफ इंडियाने 1 जानेवारी 2021 पासून चेक पेमेंटसाठी एक नवीन प्रणाली लागू केली आहे. एसबीआयने हे 50,000 रुपयांपेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीम लागू केली आहे म्हणजे चेक पन्नास हजारांपेक्षा जास्तीचा चेक दिल्यास तुम्हाला पुन्हा कन्फर्म करावे लागेल.
2. Bank Of Baroda (BoB) :
बँक ऑफ बडोदाच्या पॉझिटिव्ह पे कन्फर्मेशनशी संबंधित नियम 1 फेब्रुवारीपासून प्रभावी आहेत. BoB चा हा नियम 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेच्या चेकवर लागू आहे.
—
3. बँक ऑफ इंडिया Bank Of India (BOI) :
बँक ऑफ इंडियाच्या धनादेशांशी संबंधित हे नियम 1 जानेवारी 2021 पासून प्रभावी आहेत. BOI मध्ये रु. 50,000/- आणि त्यावरील चेक क्लिअरन्ससाठी कन्फर्मेशन अनिवार्य आहे. ग्राहकाला Drawers Account Number, चेक क्रमांक, चेकची तारीख, रक्कम आणि Payee’s Name यासह माहिती प्रदान करावी लागेल.
कशी काम करते पॉझिटिव्ह पे सिस्टीम ?
या प्रणालीद्वारे चेकची माहिती एसएमएस, मोबाइल अॅप, इंटरनेट बँकिंग आणि एटीएमद्वारे देता येईल.
चेकचे पेमेंट करण्यापूर्वी या तपशीलांची पुन्हा पडताळणी केली जाईल.
त्यात काही तफावत आढळल्यास बँक चेक नाकारेल.
येथे जर दोन बँकांचे प्रकरण असेल, म्हणजे ज्या बँकेचा धनादेश दिला गेला आहे आणि ज्या बँकेत धनादेश जमा केला गेला आहे,
या दोघांनाही याबद्दल माहिती दिली जाईल.
Web Title :- Banking Cheque Rule | sbi pnb bob boi customers know cheque payment rules
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update