शेतकर्‍यांसाठी खुशबखर ! इथं फक्त 4 % व्याजदरावर मिळणार 5 लाखापर्यंतचं KCC कर्ज, अशा प्रकारे करा अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – किसान क्रेडिट कार्ड ही छोट्या शेतकऱ्यांना मदत करणारी सरकारची सर्वात महत्वाची आणि लोकप्रिय योजना आहे. किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) असलेल्या छोट्या शेतकऱ्यांना गॅरंटीशिवाय भारत सरकार १.६ लाख रुपयांपर्यंतचे केसीसी कर्ज देत आहे. तज्ञांच्या मते, शेतकरी तीन वर्षात पाच लाख रुपयांपर्यंतचे केसीसी कर्ज घेऊ शकतात. केसीसी कर्जावरील व्याज दरही खूप कमी आहे. हे वार्षिक चार टक्केच आहे. किसान क्रेडिट कार्डची सुविधा मिळण्यासाठी शेतकऱ्याला पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत खाते उघडणे आवश्यक आहे.

किसान क्रेडिट कार्डची वैधता पाच वर्षे आहे. विशेष बाब म्हणजे सर्व केसीसी कर्ज पीक विमा योजनेत समाविष्ट आहेत. सुमारे २.५ कोटी किसान क्रेडिट कार्ड वाटप करणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. येथे छोट्या शेतकऱ्यांना केसीसीचा फायदा आणि स्वस्त केसीसी कर्जाविषयी जागरूक करणे देखील खूप महत्वाचे आहे. किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीनेदेखील अर्ज करता येतो. त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

सर्वात प्रथम शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेची वेबसाइट pmkisan.gov.in वर जावे लागेल.तेथून किसान क्रेडिट कार्ड फॉर्म डाऊनलोड करावा लागेल.हा फॉर्म जमिनीची कागदपत्रे, पिकाची माहिती इत्यादींसह भरावा लागेल.येथे शेतकर्‍याला हे सांगावे लागेल की त्याने इतर कोणत्याही बँक किंवा शाखेतून इतर दुसरे किसान क्रेडिट कार्ड बनवलेले नाही. हा अर्ज जमा करावा लागेल. यानंतर संबंधित बँकेकडून किसान क्रेडिट कार्ड दिले जाईल.

किसान क्रेडिट कार्ड सहकारी बँक आणि क्षेत्रीय ग्रामीण बँके (आरआरबी) कडून घेता येऊ शकते. तसेच हे कार्ड स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँक व्यतिरिक्त नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) कडून घेतले जाऊ शकते.