नवी दिल्ली, वृत्तसंस्था – तुम्ही देशातील सर्वात मोठ्या सार्वजनिक बँकेत म्हणजेच SBI मध्ये खाते सुरु करु इच्छित असाल तर आता तुम्ही घरबसल्या इंस्टा अकाऊंट सुरु करु शकतात. यामुळे तुम्हाला स्मार्टफोनमध्ये SBI YONO हे अॅप डाऊनलोड करावा लागेल. त्यानंतर अगदी काही स्टेप्सनंतर तुमचे खाते सुरु होईल. शिवाय योनो अॅपमधील विविध फीचरचा देखील तुम्ही वापर करु शकतात.
SBI इंस्टा सेविंग अकाऊंट च्या अटी –
जर तुमचे वय 18 वर्षांपेक्षा अधिक असेल तर तुम्ही SBI इंस्टा सेविंग अकाऊंट सुरु करु शकतात. हे खाते सुरु करणाऱ्या व्यक्तीचे एसबीआयशी पहिले कोणतेही खाते नको तसेच त्याच्यावर भारताबाहेर टॅक्स संबंधित व्यवहार नकोत. SBI Insta Savings Account सुरु करण्यासाठी तुमच्याकडे आधार नंबर, पॅन नंबर, ईमेल आणि आधारला लिंक असलेला मोबाइल नंबर असणे आवश्यक आहे. याशिवाय ग्राहकांचे दुसऱ्या कोणत्याही बँकेत किंवा वित्तीय संस्थेत ओटीपी आधारित आधार वेरिफिकेशन अकाऊंट नसावे.
खाते वापरण्याचे नियम –
एसबीआय इंस्टा सेविंंग्स अकाऊंट फक्त सिंगल नावाने सुरु करावे लागेल आणि त्याचा वापर देखील डिजिटल पद्धतीनेच करता येईल. या ग्राहकांना कॅश ट्रांजेक्शन करण्याची परवानगी नसेल. याशिवाय एकावेळी जास्तीत जास्त 49,999 रुपयापर्यंतचेच व्यवहार करता येतील. खात्यात जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेवता येईल. वर्षभरात एकूण मिळून 2 लाख रुपयांपर्यंतचा व्यवहार करता येईल. तसेच ग्राहकांना आपल्या इंस्टा सेविंग्स अकाऊंटवर किमान रक्कम ठेवावीच लागेल.
मिळतात या सर्व सुविधा –
एसबीआय इंस्टा सेविंग्स अकाऊंट सुरु केल्यानंतर एक वर्षाच्या आत बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी एकदा एसबीआयच्या शाखेत जावे लागेल. या खातेदारांना एटीएम डेबिट कार्ड देण्यात येते. सध्या एसबीआय इंस्टा सेविंग्स अकाऊंटच्या आपल्या ग्राहकांना पासबुक, चेकबुक सारख्या सुविधा देत नाही. त्यांना ईमेलच्या माध्यमातून सेटमेंट पाठवण्यात येते.
Visit : Policenama.com
- ‘फ्लॅट टमी’ दिवसभरात द्या फक्त १५ मिनिटे, ‘हे’ 6 व्यायाम करा
- गरोदर आहात ? सर्दी, खोकल्याचा त्रास होतोय ? मग ‘हे’ 5 उपाय करा
- चुकीच्या जीवनशैलीमुळे लैंगिक समस्यांमध्ये वाढ ! नपुंसकतेमुळे अनेकजण त्रस्त
- वजन कमी करण्यासाठी काय करणार ? व्यायाम की आहारावर नियंत्रण, जाणून घ्या
- वजन कमी करण्यासाठी ‘हे’ आहेत 4 सोपे उपाय, जाणून घ्या
- अशी ओळखा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी, जाणून घ्या पद्धत
- तोंडाची दुर्गंधी घालविण्यासाठी करा ‘हे’ खास घरगुती उपाय, जाणून घ्या