Personal Loan : पर्सनल लोन घेण्यापूर्वी स्वत:ला विचारा ‘हे’ 4 प्रश्न, नंतर करा लोन घेण्याचा विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   पर्सनल लोन एक असुरक्षित लोन आहे, जे कुणीही व्यक्ती किंवा नॉन बॅकिंग वित्तीय कंपनी घेऊ शकते. मात्र, याचा वापर अनेक उद्देशांसाठी केला जाऊ शकतो. ग्राहकांनी हे कर्ज घेण्यापूर्वी स्वत:ला काही प्रश्न विचारले पाहिजे. ते प्रश्न कोणते जाणून घेवूयात…

1 कर्जाची आवश्यकता काय आहे?

सर्वप्रथम स्वत:ला विचारा की, तुम्हाला कर्जाची काय आवश्यकता आहे, तुम्ही हे कर्ज का घेत आहात. याच्यातून तुम्हाला काही खरेदी करायचे आहे, घर, क्रेडिट कार्डचे पैसे भरण्यासाठी घेत आहात. स्वत:ला विचारा की, बचतीचा उपयोग करणे किंवा खरेदीमध्ये उशीर शक्य आहे का?

2 तुम्ही लोनसाठी पात्र आहात का?

सामान्यपणे, बँका क्रेडिट स्कोअर, उत्पन्न, रिपेमेंट हिस्ट्री पाहून कर्ज देतात. यासाठी, कर्ज घेण्यापूर्वी कंपन्या किंवा बँकांच्या वेबसाइटवर पात्रता निकष शोधा आणि नंतर पुढील प्रक्रिया करा.

3 तुम्ही रिपेमेंट करू शकता का?

ग्राहकांनी असे कर्ज घेतले पाहिजे, जे सहपणे चुकते करता येईल. कर्ज घेतलेल्या पैशांनी गरज पूर्ण करण्याशिवाय असे काही केले पाहिजे, जेणेकरून कर्जदार कर्जाचे पैसे भरण्यास सक्षम होईल. यासाठी आपल्या आर्थिक स्थितीचे विश्लेषण केले पाहिजे आणि कर्ज देणार्‍या कंपन्यांच्या वेबसाइटवर उपलब्ध इएमआय कॅलकुलेटरवर माहिती घेतली पाहिजे. यामुळे कर्ज रक्कम, कालावधी आणि व्याजदराच्या आधारावर मासिक रिपेमेंट समजू शकतो.

4 कर्जाचा कालावधी किती आहे?

पर्सनल लोनसाठी अर्ज करताना ग्राहकांनी कर्ज कालावधीची माहिती घेतली पाहिजे. पर्सनल लोन 6 महिने किंवा किमान 5 वर्षापर्यंत घेता येते. याचा अर्थ हा आहे की, कालावधी आणि व्याज मिळून ठरवते की, मासिक रिपेमेंट रक्कम किती असेल.