Banking New Rules | 1 फेब्रुवारीला बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार, जाणून घ्याल तर तुम्हाला फायदा होईल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Banking New Rules । पुढचा महिना खूप बदल घेऊन येईल. 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) बजेट (Budget 2022-23) सादर करतील. यामुळे देशाची अर्थव्यवस्था बदलणार असली तरी सर्वसामान्यांच्या जीवनावरही याचा परिणाम होणार आहे. बजेट (Aam budget 2022) व्यतिरिक्त जे महत्त्वाचे म्हणजे 1 फेब्रुवारीपासून काही बँकाही त्यांचे नियम बदलणार (Banking New Rules) आहेत.

SBI बँक 1 फेब्रुवारीपासून पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात बदल करणार आहे. हि बँक IMPS द्वारे रु. 2 लाख ते रु. 5 लाखांपर्यंतचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी रु. 20 + अधिक GST शुल्क आकारेल. ऑक्टोबर 2021 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने IMPS द्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे. रिझर्व्ह बँकेने IMPS द्वारे व्यवहारांची मर्यादाही 2 लाखांऐवजी 5 लाख रुपये एका दिवसात वाढवली आहे.

बँक ऑफ बडोदाचे नियम बदलणार

बँक ऑफ बडोदा (Bank Of Baroda) देखील 1 फेब्रुवारीपासून चेक क्लिअरन्स शी संबंधित नियम बदलत आहे. 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी, ग्राहकांना पॉजिटीव्ह सिस्टमला फॉलो करावे लागेल. म्हणजेच चेकच्या संबंधित माहिती पाठवावी लागेल, तरच चेक क्लिअर होईल. हे बदल 10 लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी आहेत. (Banking New Rules)

PNB चे नियम होतील कडक

पंजाब नॅशनल बँक (PNB) जे नियम बदलणार आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. तुमच्या खात्यात पैसे नसल्याने हप्ता किंवा गुंतवणूक अयशस्वी झाल्यास, तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. आतापर्यंत हा दंड 100 रुपये होता.

 

गॅस सिलेंडरची किंमत

LPGच्या किमती प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला निश्चित केल्या जातात. यावेळी 1 फेब्रुवारीला सिलिंडरच्या दरात काय चढ-उतार होतात हे पाहावे लागेल. दर वाढले तर त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या खिशावर होईल.

बजेट सादर केले जाईल

अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला बजेट सादर करणार आहेत. यामध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स (personal income tax rates) संबंधित नियमांमध्ये बदल होऊ शकतात. बजेट तुमच्या आर्थिक जीवनात आणखी बरेच बदल घडवून आणू शकते.

Web Title : Banking New Rules | banking related many rules will change on february 1 know detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Blood Sugar Range | मुले, प्रौढ आणि ज्येष्ठांची किती असावी ब्लड शुगर, पहा संपूर्ण चार्ट

 

Pune Police | पुणे पोलीस शहर दलातील 4 ‘अति’ वरिष्ठ अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लक्षणे,
पदभार इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे

 

Omicron | ओमिक्रॉनच्या ‘या’ 4 लक्षणांकडे चुकूनही करू नका दुर्लक्ष, होऊ शकते मोठी समस्या

 

TET Exam Scam | खळबळजनक ! राज्यात 7880 बोगस शिक्षक, 7880 अपात्र परीक्षार्थींना गुण वाढवून केले पात्र; पुणे पोलिसांच्या तपासात खळबळजनक खुलासा (व्हिडीओ)

Ankita Lokhande Bold Scene | अंकिता लोखंडेनं लग्नानंतर घेतला ‘हा’ मोठा निर्णय ! म्हणाली – ‘नो टू..’

Bank Holidays in Feb 2022 | फेब्रुवारी महिन्यात 12 दिवस बंद राहतील बँका, ब्रँचमध्ये जाण्यापूर्वी आवश्य पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Bhaiyyu Maharaj Suicide Case | भय्यू महाराज यांच्या आत्महत्येप्रकरणी शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक दोषी; जाणून घ्या प्रत्येकाचा ‘रोल’