Banking Rules Change | 1 फेब्रुवारीपासून ‘या’ बँकांच्या नियमात बदल ! आजच जाणून घ्या, अन्यथा होईल गैरसोय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बँका आपल्या नियमांमध्ये (Banking Rules Change) वेळोवेळी बदल करत असतात. मात्र, बँकांनी बदल केलेल्या नियमांविषयी ग्राहकांना माहीती होत नाही आणि नंतर त्रास सहन करावा लागतो. तुम्ही जर SBI, PNB किंवा बँक ऑफ बडोदा (BoB) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. या तिन्ही बँका आपल्या काही नियमांमध्ये बदल (Banking Rules Change) करणार आहे. हे नियम 1 फेब्रुवारी 2022 पासून सर्व खातेदारांना लागू होतील.

 

बँक ऑफ बडोदा चेक क्लिअरन्स नियम
बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) 1 फेब्रुवारी पासून त्यांच्या चेक क्लिअरन्स (Check Clearance) संबंधीत नियमांमध्ये बदल (Banking Rules Change) करणार आहे. 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी, ग्राहकांना सकारात्मक वेतन प्रणालीचे पालन करावे लागेल. याचा सरळ अर्थ असा की, आता ग्राहकांना चेक दिल्यानंतर त्या चेकशी संबंधित माहिती बँकेला पाठवावी लागणार आहे. अन्यथा तुमचा चेक क्लिअर होणार नाही.

 

ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बँकेने हा निर्णय घेतला आहे. तुम्ही मेसेज, इंटरनेट बँकिंग (Internet Banking) किंवा एटीएमद्वारे (ATM) चेकबद्दल बँकेलाही कळवू शकता. हा बदल केवळ 10 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी असणार आहे. जर तुम्ही या रकमेपेक्षा कमी रकमेचा चेक जारी केला तर तुम्हाला हा नियम लागू होत नाही.

PNB कडून कडक नियम
पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) जे बदल करणार आहेत ते ग्राहकांसाठी त्रासदायक आहेत. पीएनबीने बदललेल्या नियमांनुसार, तुमच्या खात्यात पैसे नसल्यामुळे तुमचा व्यवहार फेल झाला तर तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल. यासाठी तुमच्यावर 250 रुपये दंड (Penalty) आकारला जाईल. आतापर्यंत यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. तसेच डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) रद्द केल्यास 100 ऐवजी 150 रुपये दंड भरावा लागेल. हे सर्व नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होतील.

 

SBI मधून पैसे ट्रान्सफर करणे महागले
तुम्ही जर एसबीआयचे ग्राहक असाल तर पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करणे तुमच्यासाठी अधिक महाग होणार आहे.
एसबीआयच्या वेबसाईटनुसार, बँक 1 फेब्रुवारीपासून IMPS व्यवहारांमध्ये एक नवीन स्लॅब (New Slab) जोडणार आहे.
जो 2 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत आहे.
आता IMPS द्वारे 2 ते 5 लाख रुपयापर्यंत बँकेतून पैसे पाठवण्यासाठी ग्राहकांना 20 रुपये अधिक GST भरावा लागेल.

 

Web Title :- Banking Rules Change | banking rules are going to change from 1 february know in details

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा