Banking Rules Change | SBI, ICICI, PNB आणि Bank of Baroda यांनी नियमात केले मोठे बदल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Banking Rules Change | स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), आयसीआयसीआय (ICICI) आणि बँक ऑफ बडोदा (BoB) या बँकेच्या ग्राहकांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण या बँकांनी आपल्या काही नियमांमध्ये बदल (Banking Rules Change ) केले आहेत. एसबीआय, पीएनबी आणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकांनी 1 फेब्रुवारी पासून आपले नवीन नियम खातेदारांना लागू केले आहेत. तर आयसीआयसीआय या बँकेचे नवीन नियम 10 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत.

 

या चार बँकांनी नियमांमध्ये केलेल्या बदलांची (Banking Rules Change) माहिती आपल्या खातेदारांना दिली आहे. खातेदारांनी या नियमांकडे विशेष लक्ष देण्यास सांगितले आहे. नियम माहित नसल्यास ग्राहकांना नुकसान होण्याची शक्यता आहे. या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या…

 

Bank of Baroda
बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) 1 फेब्रुवारी पासून त्यांच्या चेक क्लिअरन्स (Check Clearance) संबंधीत नियमांमध्ये बदल (Banking Rules Change) करणार आहे. 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी, ग्राहकांना पॉझिटिव्ह पे सिस्टीम फॉलो (Positive Pay System) करावे लागेल. याचा सरळ अर्थ असा की, आता ग्राहकांना चेक दिल्यानंतर त्या चेकशी संबंधित माहिती बँकेला पाठवावी लागणार आहे. अन्यथा तुमचा चेक क्लिअर होणार नाही.

 

ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बँकेने हा निर्णय घेतला आहे. तुम्ही मेसेज, इंटरनेट बँकिंग (Internet Banking) किंवा एटीएमद्वारे (ATM) चेकबद्दल बँकेलाही कळवू शकता. हा बदल केवळ 10 लाखांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी असणार आहे. जर तुम्ही या रकमेपेक्षा कमी रकमेचा चेक जारी केला तर तुम्हाला हा नियम लागू होत नाही.

Punjab National Bank
पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) जे बदल केले आहेत ते ग्राहकांसाठी त्रासदायक आहेत.
पीएनबीने बदललेल्या नियमांनुसार, तुमच्या खात्यात पैसे नसल्यामुळे तुमचा व्यवहार फेल झाला तर तुम्हाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल.
यासाठी तुमच्यावर 250 रुपये दंड (Penalty) आकारला जाईल. आतापर्यंत यासाठी 100 रुपये शुल्क आकारले जात होते.
मात्र आता यामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे.
तसेच डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) रद्द केल्यास 100 ऐवजी 150 रुपये दंड भरावा लागेल. हे सर्व नियम 1 फेब्रुवारीपासून लागू झाले आहेत.

 

State Bank of India
तुम्ही जर एसबीआयचे ग्राहक असाल तर पैसे ट्रान्सफर (Money Transfer) करणे तुमच्यासाठी अधिक महाग झाले आहे.
एसबीआयच्या वेबसाईटनुसार, बँक 1 फेब्रुवारीपासून IMPS व्यवहारांमध्ये एक नवीन स्लॅब (New Slab) जोडला आहे.
जो 2 लाख ते 5 लाख रुपयापर्यंत आहे. आता IMPS द्वारे 2 ते 5 लाख रुपयापर्यंत बँकेतून पैसे पाठवण्यासाठी ग्राहकांना 20 रुपये अधिक GST भरावा लागेल.

ICICI Bank
आयसीआयसीआय बँकेने आपल्या नियमांमध्ये बदल केला आहे. ICICI बँकेने केलेले बदल 10 फेब्रुवारीपासून लागू होतील.
क्रेडिट कार्डचे (Credit Card) बिल वेळेवर न भरल्यास विलंब शुल्क वाढवण्यात आले आहे.
ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड ग्राहकांना प्रत्येक व्यवहारासाठी 2.5 टक्के व्यवहार शुल्क (Transaction Fee) भरावे लागणार आहे.
चेक (Check) किंवा ऑटो डेबिट रिटर्न (Auto Debit Return) असेल तर ग्राहकांना संपूर्ण रकमेवर 2 टक्के शुल्क भरावे लागेल.
याशिवाय ग्राहकांच्या बचत खात्यातून 50 रुपये आणि जीएसटी सह (GST) कापला जाईल. हे शुल्क किमान 500 रुपयांच्या व्यवहारांवर लागू होईल.

 

Web Title :- Banking Rules Change | sbi pnb icici and bob rules chagne from this month know in detail

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PMC Sewage Treatment Plants (PMC STP) | ‘टँकर’ अभावी एसटीपी मधील प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम साईटपर्यंत वाहून नेणे अशक्य

 

Mouni Roy – Suraj Nambiar Liplock | पार्टीमध्ये स्विमिंग पूलच्या किनारी सगळ्यांसमोर केलं मौनी रॉय आणि सुरज नांबियारनं LipLock; व्हिडिओ झाला व्हायरल

 

EPFO ने दिला इशारा, कधीही करू नका अशा चूका अन्यथा होऊ शकते पैशाचे मोठे नुकसान