सावधान ! लवकर करून घ्या तुमची कामं, 9 दिवस बँका बंद, जाणून घ्या कधी-कधी

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – बँकेशी संबंधित कामे लवकर करून घ्या कारण चालु महिन्यात बँका तब्बल 9 दिवस बंद असणार आहेत. वर्षाचा शेवटचा महिना सुरू झाला असून आज 1 डिसेंबर आहे. वर्ष अखेरिस तुम्हाला कॅशची कमतरता जाणवू नये म्हणून बँकेशी संबंधित असलेली सर्व कामे तात्काळ उरकून घ्यायला हवी.

डिसेंबर महिन्यात म्हणजेच चालू महिन्यात 5 रविवार आहेत. त्यामुळे बँका 1,8,15,22 आणि 29 डिसेंबर बंद असणार आहेत. दि. 14 डिसेंबरला दुसरा तर दि. 28 डिसेंबरला चौथा शनिवार असल्याने बँका बंद असतील. दि. 25 डिसेंबर ख्रिसमसची सुट्टी असणार आहे. त्यामुळे त्या दिवशी देखील बँका बंद राहणार आहेत. पुर्वेकडील राज्यांमध्ये बँकेला 24,25 आणि 26 अशी सलग 3 दिवस सुट्टी असणार आहे. कारण, तिकडं ख्रिसमस 3 दिवसांचा असतो. गोवा येथे दि. 19 डिसेंबरला बँकेंना सुट्टी असणार आहे. कारण, तिथं दि. 19 डिसेंबरला लिबरेशन डे असतो. बँकेच्या सुट्टया जाणून घेण्यासाठी तुम्ही रिझर्व बँक ऑफ इंडिया वेबसाईटला देखील भेट देवू शकता.

Visit : Policenama.com

You might also like