वीकेंडमुळे 3 दिवस बॅंका बंद !

अकोला : पोलीसनामा ऑनलाइन – देशातील बहुतांश बॅंकांचे कर्मचारी गुरुवारी (दि. 26) देशव्यापी संपात सहभागी झाले. त्यामुळे बॅंकेच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला. संबंधित बॅंकांनी सोशल मीडिया किंवा एसएमएसद्वारे ग्राहकांना तशा सूचना दिल्या होत्या. मात्र, असे संप आणि वीकेंड अशा सलग सुट्ट्यामुळे बॅंकांची कामे आम्ही करायची कशी, असा सवाल बॅंक ग्राहक उपस्थित करत आहेत.

राष्ट्रीय व्यापार संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली. त्यानुसार अखिल भारतीय बॅंक कर्मचारी संघटनेनेदेखील या संपात सहभाग घेतला होता. दरम्यान, 26 नोव्हेंबरच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी (दि. 27) बॅंकांचे कामकाज सुरळीत हाेते. त्यानंतर पुन्हा एकदा 28 नोव्हेंबर रोजी 4 था शनिवार आणि 29 नोव्हेबर रोजी रविवारमुळे बॅंका बंद राहणार आहेत. संप आणि वीकेंड सुट्ट्यांनंतर सलग लागून आलेली गुरुनानक जयंतीच्या सुट्टीमुळे सलग सुट्ट्यांत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा दोन दिवस बॅंका बंद राहणार आहेत.