सणासुदीच्या काळात ‘स्वस्त’ होम लोन घ्या अन् पुर्ण करा घराचं ‘स्वप्न’, ‘या’ 10 बँकांची ऑफर, जाणून घ्या

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे घर असावे असे स्वप्न असते, आणि गृहकर्जाच्या माध्यमातून ते शक्य देखील होते. त्यामुळे या सणासुदीच्या दिवसांत नागरिक मोठ्या प्रमाणात घर खरेदी करत असतात. तसेच बँका देखील स्वस्तदराने गृहकर्ज उपलब्ध करून देत असून अनेक बिल्डर्स देखील सध्या घरांवर उत्तम ऑफर्स देत आहेत.

याचदरम्यान, तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी असून मंदीच्या पार्श्वभूमीवर बाजारात तेजी येण्यासाठी नुकतंच आरबीआयने रेपो दरात कपात केली होती. त्याचबरोबर अनेक बँका आपल्या ग्राहकांना गृहकर्ज देण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे जवळपास 8.50 टक्क्यांच्या आसपास सर्व बँकांचे व्याजदर असून ग्राहकांना याचा मोठा फायदा मिळणार आहे.

हफ्त्यांना समजा गुंतवणूक
गृहकर्ज घेतल्यानंतर तुमच्यावर कर्जाचा मोठा बोजा येऊन पडणार असून भाड्यापेक्षा याचा हफ्ता कदाचित जास्त असू शकतो. त्यामुळे हफ्ता आहे आपली भविष्यातील गुंतवणूक आहे असे समजावे. सध्या घरांचे भाव हे स्थिर दिसत असले तरी भविष्यात मात्र याचे भाव खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. त्यामुळे हि गुंतवणूक फार फायदेशीर आहे.

या बँका देत आहेत प्रोसेसिंग शुल्कावर सूट
पंजाब आणि सिंध बँक आपल्या ग्राहकांच्या गृहकर्जावर कोणत्याही प्रकारचे प्रोसेसिंग शुल्क स्वीकारत नाही. तसेच सिंडिकेट बँक देखील 25 लाखांपर्यंतच्या कर्जावर केवळ 500 रुपये शुल्क स्वीकारत आहे.

सर्वात स्वस्त दराने गृहकर्ज देणाऱ्या बँका

1) यूनियन बँक 8.15-8.30 टक्के
2) सिंडिकेट बँक8.15-8.40 टक्के
3) एसबीआय 8.20-8.55 टक्के
4) सेंट्रल बँक 8.25-8.55 टक्के
5) पीएनबी 8.25-8.55 टक्के
6) बँक ऑफ इंडिया 8.35 टक्के
7) ओबीसी 8.35-8.55 टक्के
8) एचडीएफसी बँक 8.35-9.15 टक्के
9) बीओबी 8.35-9.35 टक्के
10) आंध्र बँक 8.35-9.50 टक्के

Visit : Policenama.com