Advt.

Banks Strike | खासगीकरणाविरोधात 2 दिवसांचा संप करणार बँक कर्मचारी, घरातून बाहेर पडण्यापूर्वी तारीख तपासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Banks Strike | बँकांच्या खासगीकरणाविरोधात (bank privatisation) पब्लिक सेक्टरमधील बँक कर्मचारी या महिन्यात दोन दिवसांचा संप (Banks Strike) करणार आहेत. केंद्र सरकार संसदेत बँकांच्या खासगीकरणाबाबत सादर करत असलेल्या विधेयकाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी हा संप करणार आहेत.

 

यूनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने (UFBU) संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर होत असलेल्या बँकिंग लॉ (अमेंडमेंट) बिल, 2021 च्या (banking law bill 2021) विरोधात 16 आणि 17 डिसेंबरला संपावर जाण्याची घोषणा केली आहे.

 

 

काय म्हटले युनियनने
एका न्यूज एजन्सीनुसार ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशनचे (AIBOC) महासचिव संजय दास यांनी म्हटले की, पब्लिक सेक्टरमधील बँकांच्या खासगीकरणामुळे अर्थव्यवस्थेला प्राथमिकता देणार्‍या क्षेत्रांचे नुकसान होईल आणि यामुळे बचत गट, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या कर्ज प्रवाहावर सुद्धा परिणाम होईल.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे महासचिव सी. एच. वेंकटचलम यांनी म्हटले, मागील 25 वर्षापासून AIBEA च्या बॅनरखाली आम्ही बँकिंग क्षेत्रात अशा सुधारणांना विरोध करत आहोत, ज्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे नुकसान करत आहेत. (Banks Strike)

 

राकेश टिकैट यांनी सुद्धा केले ट्विट
याबाबत शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सुद्धा ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले की, ते तर अगोदरपासूनच लोकांना सावध करत होते की, पुढील निशाणा बँका असू शकतात.

 

UFBU च्या सदस्यांमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA),
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फडरेशन (AIBOC),
नॅशनल कन्फडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (NCBE),
ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA)
आणि बँक एम्प्लॉईज कन्फडरेशन ऑफ इंडिया (BEFI) चा समावेश आहे.

 

Web Title :- Banks Strike | public sector banks to go on two day strike this month against privatisation

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Indian Bison Pune | पुण्यात ‘थरार’ केलेल्या ‘त्या’ रानगव्याची Facebook लाईव्हद्वारे प्रायश्चित सभा होणार

Pune News | 1971 च्या युद्धातील इंदिरा गांधी यांचे योगदान अविस्मरणीय ! शूर-वीरांचा इतिहास नव्या पिढीला सांगण्याची आवश्यकता – मंत्री सुनील केदार यांचे प्रतिपादन

Omicron Variant in Maharashtra | ‘…तरच महाराष्ट्रात लॉकडाऊनचा निर्णय होईल’; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टच सांगितलं

Aba Bagul | मिळकत कराच्या अभय योजनेला काँग्रेसचा विरोध, काँग्रेस नेते आबा बागूल यांचा सत्ताधारी आणि प्रशासनावर हल्लाबोल