खुशखबर ! फक्त 59 मिनिटांत कर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून केंद्र सरकारने घरांची विक्री वाढवण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेला वेग देण्यासाठी केवळ ५९ मिनिटांमध्ये कर्ज मंजूर करण्याच्या तयारीत आहे. अर्थमंत्रालयाला बँकांकडून एक प्रस्ताव मिळाला आहे, त्यानुसार नवीन योजना बनवली जाणार असून कर्जवाटप सहज आणि सोपे व्हावे यासाठी निर्णय घेतला जाणार आहे. सरकारी बँकांचे अध्यक्ष, एमडी, सीईओ यांच्याशी झालेल्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना हा प्रस्ताव मिळाला.

व्यावसायिकांना व्यावसायानुसार मिळणार कर्ज :
सर्व प्रकारच्या व्यावसायिकांना ५९ मिनिटांत कर्ज देण्याच्या प्रस्तावावर अर्थमंत्रालय विचार करत असून या बैठकीत वित्त सचिव राजीव कुमार देखील उपस्थित होते. सध्या या प्रकारची सुविधा केवळ छोट्या व्यावसायिकांना मिळत आहे. त्यासाठी त्यांना psbloansin59minutes.com वर एक कोटीपर्यंतच्या कर्जासाठी आवेदन करता येते.

कार, घर घेण्यासाठी देखील तात्काळ लोन :
बँकांकडून मिळालेल्या एका प्रस्तावानुसार आता असे एक पोर्टल सामान्य ग्राहकांसाठीसुद्धा सुरु केले जाणार आहे. ज्यामुळे त्यांना होम, ऑटो आणि पर्सनल लोन सहजरित्या मिळेल. असे केल्याने अर्थव्यवस्थेला चांगलीच चालना मिळेल आणि मागणी वाढल्यामुळे ऑटो, रियल इस्टेट आणि इलेक्ट्रोनिक्स सेक्टर्स ला चांगला फायदा होईल.

बँकांनी वाढवली कर्जाची सीमा :
MSME क्षेत्राला या ५९ मिनिट लोन योजनेनुसार आता १ कोटींऐवजी ५ कोटी रुपयांपर्यंचे कर्ज मिळणार असून कर्जाची रक्कम ८ कामकाजी दिवसांमध्ये खात्यावर जमा होईल. SBI सहित पाच सरकारी बँकांनी कर्जाची सीमा वाढवली आहे. मोदी सरकारने नोव्हेंबर २०१८ मध्ये एमएसएमई क्षेत्राच्या वाढीसाठी या योजनेची सुरुवात केली होती.

आरोग्यविषयक वृत्त –