UPI ट्रांजक्शन झाले फेल तर बँक रोज देईल 100 रुपयांची भरपाई, ‘इथं’ करा तक्रार, जाणून घ्या

नवी दिल्ली : नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 एप्रिलला देशातील सर्व सरकारी आणि प्रायव्हेट बँका बंद होत्या. बँक बंद होण्याचे कारण व्यवहारासाठी ऑनलाइन ट्रांजक्शन वाढले होते. या दरम्यान एनईएफटी, आयएमपीएस आणि युपीआयद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यात ग्राहकांना समस्येला तोंड द्यावे लागत होते. अनेकदा ग्राहकांचे युपीआय ट्रांजक्शन फेल झाले. जर तुमचे सुद्धा युपीआय ट्रांजक्शन फेल झाले असेल आणि अकाऊंटमधून कापले गेलेले पैसे ठरलेल्या कालावधीत परत आले नाहीत, तर बँक तुम्हाला रोज 100 रुपये भरपाई देईल.

भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2019 मध्ये फेल्ड ट्रांजक्शनबाबत नवीन सर्क्युलर जारी केले होते. या अंतर्गत पैशांच्या ऑटो रिव्हर्सलसाठी टाइम फ्रेम सेट केली आहे. या कालावधीच्या आत ट्रांजक्शनची सेटलमेंट किंवा रिव्हर्सल न झाल्यास बँकेला ग्राहकांना भरपाई द्यावी लागेल. सक्युर्लरनुसार, कालावधी संपल्यानंतर 100 रुपये रोजच्या हिशेबाने भरपाई द्यावी लागेल.

येथे करा तक्रार
जर तुमचे पैसे युपीआय ट्रांजक्शन केल्यानंतर परत आले नाहीत तर याची तक्रार सर्व्हिस प्रोव्हायडरकडे करू शकता. तुम्हाला रेज डिस्प्यूटवर जावे लागेल. रेज डिस्प्यूटवर आपली तक्रार नोंदवा. प्रोव्हायडरला तुमची तक्रार योग्य आढळल्यानंतर पैसे परत करेल. जर तक्रार केल्यानंतर सुद्धा बँकेकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसेल तर तुम्ही आरबीआयच्या डिजिटल ट्रांजक्शन, 2019 च्या ओम्बड्समॅन स्कीम अंतर्गत तक्रार करू शकता.

5 लाख कोटी रुपयांचा आकडा पार
युपीआय ट्रांजक्शनमध्ये दर महिन्याला 19 टक्केची वाढ होत आहे आणि आर्थिक वर्ष 21 मध्ये 5 लाख कोटी रुपयांच्या मुल्याचे ट्रांजक्शन झाले. मागील वर्षी देशभरात क्यूआर-आधारित पेमेंट वाढल्याने युपीआय व्हॅल्यूमध्ये तेजी आली आहे.