नवरात्रीमध्ये ‘कॅश’ची ‘बोंबाबोंम’ ? बँका सलग 5 दिवस बंद, आत्ताच सोय करा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवरात्रीचा उत्सव २९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नवरात्र सुरू होताच यावर्षीचा उत्सवाचा हंगाम सुरू होईल आणि लोक खरेदी करण्यास सुरवात करतील. परंतु यापूर्वी तुम्हाला रोख रकमेच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. म्हणून, आपण पुढील तीन दिवसांत आपण रोख रकमेची व्यवस्था करने गरजेचे आहे. कारण या महिन्याच्या शेवटी बँका सलग पाच दिवस बंद राहतील. बँक बंद असल्याने रोखीचे संकट अधिक तीव्र होऊ शकते. अशा परिस्थितीत आपण बँका बंद होण्यापूर्वी आपली तयारी पूर्ण करावी जेणेकरुन नंतर कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवू नये.

ही आहेत बँका बंद असण्याची कारणे :
मिळालेल्या माहितीनुसार, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी बँक कर्मचारी संपावर असणार आहेत. हे कामगार १० सरकारी बॅंकांच्या विलीनीकरणाला विरोध करीत आहेत. त्यानंतर २८ सप्टेंबरला महिन्याचा चौथा शनिवार असल्याने सुट्टी असेल आणि २९ रोजी तर रविवार आहे. सलग २६ ते २९ तारखेपर्यंत बंद राहिल्यानंतर ३० सप्टेंबर रोजी बँका उघडल्या जातील, परंतु या दिवशी यावर्षीच्या अर्ध्या आर्थिक वर्षाची समाप्ती असल्याने बँकांमध्ये अंतर्गत कामकाज चालणार असून कोणताही व्यवहार होणार नाही. त्यामुळे सलग ५ दिवस बँक बंद राहिल्यामुळे सामान्य माणूस तसेच व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

एटीएममध्ये रोखीचे संकट येण्याची शक्यता :
पाच दिवस सतत बँक बंद राहिल्यामुळे एटीएमवर याचा परिणाम होऊ शकतो. एटीएममध्ये पैशांचा अभाव रोखीची कमतरता वाढवू शकतो. कारण एटीएममध्ये साधारणतः दोन दिवसांची रोख क्षमता आहे. मात्र, संपानंतर बँक बंद असल्याने सलग ५ दिवस एटीएममध्ये रोकड जोडली जाणार नाही.

चेक क्लीअर होण्यास अधिक वेळ लागेल :
संप आणि बंद दरम्यान आपण बँकेत चेक ठेवल्यास, तो क्लीअर होण्यास आठवडा लागू शकेल. म्हणजेच २५ सप्टेंबर रोजी ठेवलेला चेक ३ ऑक्टोबरपर्यंत क्लीअर होईल. १ ऑक्टोबर रोजी धनादेश मंजूर होईल व त्यानंतर २ तारखेला गांधी जयंतीमुळे सुट्टी आहे. अशा परिस्थितीत ३ ऑक्टोबर रोजी पैसे खात्यात येतील.

हे आहे संपाचे कारण :
१० बँकांचे विलीनीकरण करण्याच्या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ४ कामगार संघटनांनी संपावर जाण्याची घोषणा केली आहे. ज्यामध्ये ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर कॉंग्रेस आणि नॅशनल ऑर्गनायझेशन बँक ऑफिसर यांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. बँकिंग क्षेत्रातील विविध कामगार संघटना सरकारच्या या निर्णयाला विरोध करीत आहेत. संघटनांचे म्हणणे आहे की असे केल्यास हजारो रोजगार गमावल्यास, नॉन-परफॉर्मिंग मालमत्ता (NPA) देखील वाढतील.

तथापि, संपादरम्यान बँकांची अधिकृत रजा असणार नाही, अशा परिस्थितीत इंटरनेट बँकिंग, ऑनलाइन आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस आणि यूपीआय हस्तांतरण यासारख्या सुविधा बंद होऊ नयेत अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआय म्हणते की प्रस्तावित २ दिवसाच्या संपादरम्यान बँकेच्या कामकाजावर परिणाम होऊ शकेल. परंतु बँकेने आपल्या शाखा व कार्यालयांमध्ये सामान्य कामकाजाची सर्व व्यवस्था केली आहे.

Visit :- policenama.com

You might also like