ऑगस्टमध्ये तब्बल 12 दिवस बँका बंद राहणार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – श्रावण सुरु झाला की अनेक सणांना सुरुवात होते. ऑगस्ट महिन्यामध्ये राष्ट्रीय व स्थानिक सण आले आहेत. ऑगस्ट महिन्यात सणांची रलचेल सुरु होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बँका तब्बल 12 दिवस बंद राहणार आहेत. हे दिवस लक्षात घेऊन नागरिकांनी आपली बँकेतील सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत. स्थानिक पातळीवरील सुट्यांनुसार यामध्ये काही राज्यांत बदल होईल.

ऑगस्टमध्ये बकरी ईद, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी, स्वातंत्र दिन, गणेश चतुर्थी, मोहरम, हरतालिका असे सण या महिन्यात येणार आहेत. यातील काही सण-उत्सवाांना राष्ट्रीय सुट्ट्या असतात. तर काही सण-उत्सवांना प्रादेशिक-स्थानिक पातळ्यांवर सुट्या असतात. याशिवाय ऑगस्टमध्ये पाच रविवार आले आहेत. त्यातच दुसरा आणि चौथा शनिवार म्हणून 8 ऑगस्ट आणि 29 ऑगस्ट रोजी सुट्ट्या असतील.

अशा प्रकारे आहेत ऑगस्टमध्ये येणाऱ्या सुट्ट्या
1 ऑगस्ट – शनिवार बकरी ईद (राजपत्रित सुट्टी)
3 ऑगस्ट – सोमवार रक्षाबंधन (स्थानिक सुट्टी)
11 ऑगस्ट – मंगळवार गोकुळष्टमी (स्थानिक सुट्टी)
12 ऑगस्ट – बुधवार गोकुळष्टमी (राजपत्रित सुट्टी)
15 ऑगस्ट – शनिवार – स्वातंत्र्य दिन (राजपत्रित सुट्टी)
21 ऑगस्ट – शुक्रवार – तीज-हरतालिका (स्थानिक सुट्टी)
22 ऑगस्ट – शनिवार – गणेश चतुर्थी (स्थानिक सुट्टी)
30 ऑगस्ट – रविवार – मोहरम (राजपत्रित सुट्टी)
31 ऑगस्ट – सोमवार – ओनम (स्थानिक सुट्टी)
रिझर्व्ह बँकेच्या कोष्टकानुसार 1 ऑगस्ट रोजी बँका चंदीगड, पणजी आणि गंगटोक वगळता देशातील सर्व शहरांत बंद राहतील.