8 दिवस बंद राहतील बँका, ऑनलाइन व्यवहारसुद्धा होतील ठप्प, लवकर उरकून घ्या कामं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – 8 ते 15 मार्चपर्यंत लागोपाठ आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. यामध्ये 5 सरकारी सुट्ट्या आणि तीन दिवस संप आहे. म्हणजेच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात बँकांनी व्यवसायिकांपासून सर्वसामान्य लोकांपर्यंत सर्वांना त्रास देण्याची तयारी केली आहे. बँकांच्या संपाच्या काळात सर्वरसुद्धा ठप्प करण्यात येतो, यामुळे ऑनलाइन बँकिंगचा पर्यायसुद्धा उपलब्ध राहात नाही. बँक अधिकारी सांगतात की, शहरात सरासरी 300 करोड रूपयांचे चेक, ड्राफ्ट आणि ऑनलाइन ट्रांजक्शनचे प्रति दिवस क्लियरिंग होते. बँका बंद राहिल्याने व्यवहार पुढे सरकत नाहीत.

आठ दिवस बँकिंग ठप्प झाल्यास सुमारे 2500 करोड रूपयांच्या व्यवहारांवर परिणाम होणार आहे. यापैकी सुमारे 2000 करोडची रक्कम व्यवसायिक व्यवहारांची असेल. तीन दिवसाच्या संपामध्ये जर बँकांनी सर्वर ठप्प केला नाही तर रिझर्व्ह बँकेकडून ऑनलाइन व्यवहारांचे क्लियरिंग होऊ शकते. खात्याच्या हिशेबानुसार व्यवहाराची मर्यादा ठरलेली असते.

पीएनबी ऑफिसर्स असोसिएशनचे महासचिव अनिल कुमार मिश्रा यांचे म्हणणे आहे की, संपाबाबत बँक संघटनांची भूमिक स्पष्ट आहे. तसेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या न्याय मागण्या पाहता अर्थ मंत्रालयाचा आर्थिक सेवा विभाग 29 फेब्रुवारीला भारतीय बँक संघासोबत चर्चा करणार आहे.

यानंतर 5 मार्चला मुख्य कामगार आयुक्तांनी (केंद्रीय) सुद्धा मिटींग बोलावली आहे. या बैठकांमधून काहीतरी सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षा आहे.

अशा बंद राहतील बँका

8 मार्च- रविवार
9 मार्च- होळी
10 मार्च- होळी
11 मार्च- संप
12 मार्च- संप
13 मार्च- संप
14 मार्च- दूसरा शनिवार
15 मार्च- रविवार