बंदी घातलेल्या चायनीज अ‍ॅप्सची नव्यानं भारतात ‘एन्ट्री’, अल्पावधीतच कोटयावधींनी केले Download

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारताकडून ३ टप्प्यांमध्ये अनेक चायनीज ॲप्स वर बंदी घालण्यात आली. पण तरीही चीन हे ॲप्स भारतीय युजर्सपर्यंत पोहोचण्यासाठी नवनवीन पद्धतींचा अवलंब करत आहे. गेल्या काही महिन्यात अनेक इंडियन ॲप्स स्टोर्सवर नवीन चायनीज ॲप्स पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनेक चिनी ॲप्सच्या रिब्रँडेड व्हर्जनचा सुद्धा समावेश आहे. राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होत आहे असे सांगून भारताकडून या ॲप्सवर बंदी घालण्यात आली होती. भारताकडून आधी टिकटॉकसह ५९ चायनीज ॲप्सवर त्यानंतर जुलैमध्ये ४७ ॲप्सवर व सप्टेंबर मध्ये ११८ॲप्सवर बंदी घालण्यात आली.

या बंदी घालण्यात आलेल्या चायनीज ॲप्सनी नवीन स्वरूपात भारतात एन्ट्री घेतली आहे. प्रसिद्ध snack video नावाचा व्हिडिओ ॲप tencent च्या मालकीच्या kuaishou नावाच्या चीनी कंपनीकडून बनवण्यात आला आहे. snack video ॲपला गुगल प्ले स्टोरवरून १० कोटीहून अधिक लोकांनी डाऊनलोड केलं आहे. या ॲप्स मध्ये युजर्संना प्रसिद्ध शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ॲप टिकटॉक सारखे फीचर्स देण्यात आले आहे. भारताकडून hago ॲपवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. ह्या ॲपमध्ये आपण अज्ञात लोकांसोबत चॅट रूम बनवून त्यांच्याबरोबर गेम खेळण्याची सुविधा देत होता. आता ह्या ॲपच्या जागी आता Ola Party नावाचे ॲप आले आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, यामध्ये गेम खेळण्याची सुविधा नाही आहे परंतु या ॲपमध्ये hago यूजर्सची प्रोफाइल, फ्रेंड्स आणि चॅट रूम्स ला इंपोर्ट केले आहे. म्हणजेच hago यूजर्स डायरेक्ट Ola Party ॲपवर साइन इन करू शकतात. बंदी घालण्यात आलेले चायनीज ॲप लगातार नवीन व्हर्जनमध्ये येत आहेत असा प्रश्न इकॉनॉमिक टाइम्सकडून उपस्थित करण्यात आला आहे. यावर कारवाई करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे नाही झाले [पाहिजे पण असे जर होत असेल तर आम्ही यावर नक्की कारवाई करू असे त्या अधिकाऱ्याने सांगितले आहे.