बापटांनी बोलवली आज बैठक… 

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – पालकमंत्री गिरीश बापट आज बुधवारी महापालिकेतील 100 नगरसेवकांची बैठक घेणार आहेत. ही बैठक रात्री ८ वाजता डीपी रस्त्यावरील एका हॉटेलात घेतली जाणार आहेत. लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमिवर पुण्यातील जागेसाठी  राजकीय वर्तूळात उलटसुलट चर्चा चालु असतांना, बापटांनी बोलावलेली ही बैठक सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे.

पुण्याच्या लोकसभेच्या जागेसाठी गिरिश बापट, विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचे नाव चर्चेत आहे. परंतु  भाजपा पक्षाने अजून उमेदवार घोषीत केलेला नाही. त्यामुळे राजकीय वर्तूळात उलटसुलट चर्चा चालु आहे. त्यातच बापटांनी आज ही बैठक बोलावली, त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये गोंधळचे वातावरण निर्माण झाले आहे .

गिरिश बापट यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन नुकतेच नागपुर येथे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले . या कार्य अहवालाचे वाटप नगरसेवकांना करण्यात येणार आहे . तेव्हां लोकसभेच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री गिरिश बापट या बैठकीत काय बोलणार ? याकडे सर्व नगरसेवकांचे लक्ष लागलेले आहे.