उदयनराजेंकडून बापट यांना साताऱ्यातून खासदारकीची ऑफर

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन

बापट साहेबांच्या येण्यामुळे मन प्रफुल्लित होते. एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. मी त्यांना गाडीतून येताना सांगितले, बस्स झाला महाराष्ट्र, तुम्ही आता दिल्लीत या. म्हणजे तुमचा सहवास जास्त लाभेल. बापटसाहेबांची इच्छा असेल तर त्यांनी साताऱ्यातून उभे रहावे, मी त्यांच्यासाठी माघार घेईन, अशी जाहीर ऑफर खासदार उदयनराजे भोसले यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना दिली. अर्थात, उदयनराजेंनी आपल्या मिश्किल शैलीत हे विधान केले, आणि त्यामागील किस्साही त्यांनी सांगितला.

[amazon_link asins=’B071CP6K43,B072MFVNML’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’c980b053-ae79-11e8-ab4f-ab9a82f95e87′]

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सातारा शाखेच्या उद्‌घाटन प्रसंगी अन्न व नागरीपुरवठा मंत्री गिरीश बापट आणि खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी उदयनराजेंनी बापटांना साताऱ्यातून खासदारकी लढवण्याची ऑफर देऊन आश्चर्याचा धक्का दिला. उदयनराजे म्हणाले, मी त्यांना गाडीतून येताना सांगितले, बस्स झाला महाराष्ट्र, तुम्ही आता दिल्लीत या. म्हणजे तुमचा सहवास जास्त लाभेल. बापटसाहेबांची इच्छा असेल तर त्यांनी साताऱ्यातून उभे रहावे, मी माघार घेईन.

गिरीश बापट यांनीही या कार्यक्रमात बोलताना उदयनराजेंबद्दल आदर व्यक्त केला. शिवाय, या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यामागचे कारणही सांगतिले. गिरीश बापट म्हणाले, या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे आहेत, हे समजल्यामुळे मी पुण्याचा कार्यक्रम रद्द करून साताऱ्याच्या कार्यक्रमाला खास आलो. कारण व्यासपीठावर उदयनराजेंसोबत असणे, यासाठी भाग्य लागते. पूर्वी आम्ही अनेकदा एका व्यासपीठावर होतो. आज या निमित्ताने महाराज येथे आहेत. मला जुनी पोटनिवडणूक आणि खासदारकीची निवडणूक आठवते. उदयनराजे असले, की आमच्यासारख्या कार्यकर्त्यांला उत्साह येतो. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देतो, असे बापट म्हणाले.

दोनच दिवसांपूर्वी दिवाकर रावते यांनीही काहीसे अशाच प्रकारचे वक्तव्य साताऱ्यात केले होते. छत्रपतींच्या वारसांना संसदेतून बेवारस करण्याचा कट काहीजण आखत आहेत, असे रावते म्हणाले होते. शिवाय शिवसेनेकडून त्यांना उदयनराजेंना सहकार्याचा हातही पुढे केला होता. यानंतर बापट यांनी आता उदयनराजेंशी विशेष जवळीक साधल्याचे दिसून येत आहे.

जात प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या चार नगरसेवकांची माहिती राज्य सरकारला पाठवली

जाहिरात