फेमस बॉलिवूड सिंगर, कंपोजर बप्पी लहरी का परिधान करतात एवढं सोनं ? खास आहे कारण ! जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड सिंगर आणि कंपोजर बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांनी 500 पेक्षा जास्त गाणी कंपोज केली आहेत. पॉप म्युझिकला बॉलिवूडचा महत्त्वाचा भाग बनवण्याचं श्रेयदेखील बप्पी लहरी यांना जातं. 80 चं दशक असो किंवा मग आजची लेटेस्ट गाणी असो त्यांचा अनोखा अंदाज कायमच पसंत केला गेला आहे.

बप्पी फक्त आपल्या गाण्यांसाठी फेमस नाहीत, तर त्यांच्या अंगावरील सोन्यासाठीही ते फेमस आहेत. ते बॉलिवूडमधील एकमेव सिंगर आहेत, जे एवढं सोनं परिधान करून जात असतात. परंतु ते एवढं सोन का परिधान करतात हा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे. त्यांना सोनं एवढं का आवडतं, याबद्दल अनेकांना कुतूहल आहे.

खुद्द बप्पी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, त्यांनी हॉलिवूड कलाकारामुळं एवढं सोनं घालायला सुरुवात केली होती. त्यांनी याचा एक किस्साही शेअर केला होता.

बप्पीनं सांगितलं की, मला हॉलिवूड कलाकार एलविस प्रेस्ली खूप आवडत होते. मी पाहिलं होतं की, ते कायम सोन्याची चेन घालत होते. मला त्यांचा तो अंदाज खूप आवडला.

बप्पी यांना एवढं सोनं घालायचं होतं जेवढं सक्सेसफुल त्यांना करिअरमध्ये व्हायचं होतं. सोनं त्यांच्यासाठी लकी आहे असं ते मानत होते.

अनेकांना असाही प्रश्न पडला होता की, ते नेमकं किती किलो सोनं घालतात. जेव्हा त्यांनी 2014 ची निवडणूक लढवली होती, तेव्हा त्यांनी याबद्दल माहिती दिली होती. त्या माहितीनुसार, बप्पी यांच्याकडे 754 ग्रॅम सोनं आणि 4.62 ग्रॅम चांदी आहे.

 

You might also like