Bappi Lahiri Net Worth | संगितकार बप्पीदा होते ‘एवढ्या’ कोटीचे मालक, बप्पीदांकडे होते ‘एवढे’ सोने अन् महागड्या गाड्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bappi Lahiri Net Worth | भारतरत्न लता मंगेशकर (Bharat Ratna Lata Mangeshkar) यांच्या निधनानंतर संपूर्ण बॉलिवूडला धक्का बसला असताना आता आणखी एक धक्का बसला आहे. ज्येष्ठ संगीतकार (Musician) आणि गायक (Singer) बप्पी लहिरी (वय-70) यांचे बुधवारी (दि.16) निधन (Bappi Lahiri Passes Away) झाले. बप्पी लहिरी यांनी 80 आणि 90 चा काळ गाजवला होता. त्यांचे संगित आणि गाणी विशेष लोकप्रिय झाली होती. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण संगीतामुळे ते प्रत्येक पिढ्यांशी जोडले गेले होते. ‘डिस्को डान्सर’, ‘चलते-चलते’, ‘शराबी’ पासून ते अगदी 2020 मध्ये प्रदर्शीत झालेल्या ‘बागी 3’ (Baaghi 3) या चित्रपटांपर्यंत त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले होते. संगितकार, गायक म्हणून ते जेवढे प्रसिद्ध होते, तितकेच ते त्यांच्या पेहरावासाठी प्रसिद्ध होते. बॉलिवूडमध्ये (Bollywood) सर्वाधिक मानधन घेणाऱ्या गायकांपैकी ते एक होते. बप्पीदा (Bappida) या नावाने ते बॉलिवूडमध्ये परिचित असलेल्या बप्पी लहिरी यांची एकूण संपत्ती, (Bappi Lahiri Net Worth) मानधनाचे आकडे आश्चर्यकारक होते.

 

बप्पी लहरी यांनी मुंबईतील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये (Criticare Hospital Mumbai) अखेरचा श्वास घेतला. ते मागील एक महिन्यापासून रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारी त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती पुन्हा बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. बप्पी लहिरी यांना आरोग्याच्या अनेक समस्या होत्या, असे एका वृत्तवाहीनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

 

सर्वाधिक मानधन घेणारे गायक
बॉलिवूडमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे गायक अशी बप्पीदा यांची ख्याती होती. बप्पीदा केवळ गायक किंवा संगीतकार नव्हते तर ते संगिताचे कार्यक्रम आयोजित करत होते. तसेच ते उत्तम अभिनेते होते आणि रिॲलिटी शोजमध्ये जजही होते. बप्पीदा यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक बंगाली गाणी (Bengali Songs) गायली. याशिवाय स्टेज परफॉर्मन्सही (Stage Performance) करत होते. बप्पीदा यांनी एक विक्रम केला आहे. एका वर्षात त्यांनी 33 चित्रपटांमध्ये 180 गाणी रेकॉर्ड केली असून त्यांच्या या  रेकॉर्डची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये (Guinness Book of World Records) झाली आहे.

एका गाण्यासाठी एवढे मानधन
एका अहवालानुसार संगितकार, गायक असलेले बप्पी लहिरी यांची निव्वळ (Bappi Lahiri Net Worth) संपत्ती 22 कोटी रुपये आहे. बॉलिवूड चित्रपटाच्या एका गाण्यासाठी ते 8 ते 10 लाख रुपये मानधन घेत होते. याशिवाय एका तासाच्या लाईव्ह परफॉर्मन्ससाठी 20 ते 25 लाख रुपये घेत होते. बप्पीदांची मासिक कमाई 20 लाखांहून अधिक तर वार्षिक 2 कोटीहून अधिक होती. बप्पीदांनी चॅरिटीसाठीही अनेक कार्यक्रम केले होते.

 

सोन्याची खास आवड
बप्पीदांना सोन्याची (Gold) खास आवड होती. सोन्यामुळे नशीब उजळते, या विचाराने बप्पीदा दररोज सात ते आठ सोन्याच्या चेन (Gold Chain) घालत होते.
त्यांच्याकडे खूप सोने होते. ‘मला दागिने घालणं आवडतं’ असं ते नेहमी सांगायचे.
जर एखाद्या कलाकाराचा परफॉर्मन्स त्यांना आवडला तर ते त्यांच्याकडे असलेले सोन्याचे दागिने त्या कलाकाराला भेट म्हणून देत होते.
2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार (Election Affidavit) बप्पी लहिरी यांच्याकडे तब्बल 754 ग्रॅम सोनं होतं.

महागड्या कारचं कलेक्शन
मीडिया अहवालानुसार बप्पीदा हे महागड्या गाड्यांचे शौकिन होते.
त्यांच्या लक्झरी गाड्यांच्या (Luxury Cars) खास कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू (BMW), ऑडी (Audi) याशिवाय 55 लाखाची एक टेस्ला कारचा (Tesla Car) समावेश होता. बप्पीदा हे मुंबईतील एका लक्झुरिअस घरात (Luxurious Home) राहत होते.
हे घर त्यांनी 2001 मध्ये खरेदी केले होते. त्यांच्या या घराची किंमत 3.5 कोटी एवढी आहे.
तसेच त्यांनी देशातील अनेक शहरांमध्ये प्रॉपर्टी खरेदी केली आहे.

 

किशोर कुमार मुळे बॉलिवूडमध्ये
ज्येष्ठ गायक किशोर कुमार (Kishore Kumar) हे बप्पीदा यांचे मामा होते.
त्यांनी बप्पीदा यांना चित्रपटसृटीत आणले, असे एका वृत्तात म्हटले आहे.
चित्रपटसृष्टीत आल्यानंतर बप्पीदा यांनी आपल्या टॅलेंट आणि गायन, संगिताच्या जोरावर खूप नाव कमावलं.
त्यांच्या गाण्याची लोकप्रियता खुप आहे.

 

Web Title :- Bappi Lahiri Net Worth | bappi lahiri demise know bappi lahiri net worth and car collection

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा