मार्व्हल स्टुडिओच्या आगामी चित्रपटात बप्पी लहरींचं गाणं ?

पोसीसनामा ऑनलाईन – ८०-९० मधील बॉलिवूडचा काळ आपल्या आवाजाने आणि संगीताने गाजवून टाकणारे बप्पी लहरींच्या आवाजाची भुरळ आता हॉलीवूडलाही पडली आहे. कारण मार्व्हल स्टुडिओच्या आगामी चित्रपटात बप्पी लहरींचं गाणं ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भात मार्व्हल स्टुडिओशी चर्चा होत असल्याचं बप्पी लहरींनी स्पष्ट केलं आहे.

याआधी बप्पी लहरींच्या ‘झूम झूम झूम बाबा’ या लोकप्रिय गाण्याच्या क्लिपचा २०१७ मध्ये प्रदर्शित झालेला अमेरिकन चित्रपट ‘गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी २’ मध्ये समावेश करण्यात आला होता.

यावर बप्पी लाहिरीं म्हणाले, ”गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी २’ मध्ये माझ्या गाण्याची झलक ऐकायला मिळाली. या चित्रपटाचा मुख्य अभिनेता क्रिस प्रॅटलाही माझं गाणं फार आवडलं होतं. आता तुम्हाला माझं पूर्ण गाणं मार्व्हल स्टुडिओच्या चित्रपटात ऐकायला मिळू शकेल. एप्रिलमध्ये मी हॉलिवूडला जाईन,’ असं यावेळी बप्पी म्हणाले.

बप्पी लहरीं यांनी ८०-९० मध्ये अनेक सुपरहिट गाणी दिली. जी आजही प्रेक्षकांमध्ये प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी दिग्दर्शक म्हणूनसुद्धा काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वी बप्पी लहरीं यांनी पहिल्यांदाच मराठी चित्रपटात गाणं गायलं होते. आता आगामी काळात बप्पी हॉलिवूड चित्रपटात गाताना दिसतील.