Bappi Lahiri Song | चीनमध्ये लॉकडाऊनला विरोध; बप्पी लहरी यांचं ‘हे’ गाणं वाजवून करतायत निषेध

पोलीसनामा ऑनलाईन टीम : Bappi Lahiri Song | भारतातील अनेक चित्रपट आणि गाणी विदेशात मोठ्या प्रमाणात गाजतात. सध्या चीनमध्ये (China) जवळपास चार दशकां पूर्वीचे दिवंगत संगीतकार बप्पी लहरी (Bappi Lahiri Song) यांनी संगीतबद्ध केलेले गाणे सध्या जोरात वाजवले जात आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोविड 19 (Covid-19) मुळे संपूर्ण शहरात लॉकडाऊन करण्याचा निर्णय सरकारने घेतल्यामुळे त्यांच्या विरोधात तेथील नागरिक हे गाणे वाजवत आहेत.

 

हे गाणं ‘डिस्को डान्सर’ (Disco Dancer) या चित्रपटातील असून पार्वती खान (Parvati Khan)
आणि विजय बेनेडिक्ट (Vijay Benedict) यांच्या आवाजात हे रेकॉर्ड केले आहे.
तर बप्पी लहरी यांनी त्याला संगीतबद्ध केले होते.
‘जिम्मी जिम्मी आजा आजा’ (Jimi Jimi Aaja Aaja) हे गाणे सध्या चीनमध्ये मोठ्या प्रमाणात वाजवले जात आहे कारण देखील तेवढेच रंजक आहे.

या गाण्यातील जिमी या शब्दांचा अर्थ मला जेवण द्या असे मँडरिन भाषेत होतो.
त्याचाच आधार घेऊन लॉकडाऊन दरम्यान त्यांना अन्नपुरवठा कसा होईल हे दर्शवण्यासाठी येथील नागरिक या गाण्याचा वापर करत आहेत.
आतापर्यंत चीनमध्ये 2675 कोविड रुग्ण आढळले आहेत आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना
दिसत असल्याने येथील राष्ट्राध्यक्षांनी लॉकडाऊन (Lockdown) घोषित केला आहे.

 

Web Title :-  Bappi Lahiri Song | this bappi lahiri song from disco dancer is the new anthem for covid 19 lockdown protests in china

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | येणार्‍या जाणार्‍यांना लुटणार्‍या सराईत गुन्हेगाराला तरुणाने दिले पकडून; कोंढव्यातील घटना

Aishwarya Rai | करीनाच्या कृपेनेच ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एन्ट्री…

Lok Sabha Election 2024 | लोकसभेसाठी भाजपचे मिशन 45! शिवसेना-राष्ट्रवादीचे बालेकिल्ले निशाण्यावर