Bapu Nayar Gang | पुणे : ‘त्या’ मोक्का प्रकरणात कुख्यात गुंड बापू नायर सह 8 जणांची निर्दोष मुक्तता

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Bapu Nayar Gang | व्यावसायिकाला धमकावून त्यांची जागा बळकाविल्या (Land Grabbing Case) प्रकरणी कुख्यात गुंड बापू नायर याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने (Pune Session Court) बापु नायर याच्यासह सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डि.व्ही. कश्यप (Judge D. V. Kashyap) यांनी मंगळवारी (दि.28) हा आदेश दिला आहे.(Bapu Nayar Gang)

जमीनीचा बेकायदेशीर ताबा मारणे, खंडणी आणि खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दिपक उर्फ डी कृष्णा कदम, अमोल उर्फ पम्या अयोध्या प्रसाद बसवंत, कुमार उर्फ बापू प्रभाकर नायर, निलेश श्रीनीवास बसवंत, अमीत राजाभाऊ जरांडे, वर्षा शंकर फडके, दत्तात्रय उर्फ दत्ता बाळू माने, नितेश श्रीनीवास बसवंत यांच्यावर कोंढवा पोलीस ठाण्यात आयपीसी 387, 447, 307, 504, 506(2), 34 सह आर्म ॲक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन मोक्का कलमाचा (MCOCA) अंतर्भाव करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची रवानगी येरवडा कारागृहात (Yerawada Jail) करण्यात आली. याबाबत निलेश कुंतीलाल बोत्रा यांनी फिर्याद दिली आहे.

कुख्यात गुंड बापू नायर, निलेश बसवंत (Nilesh Baswant) आणि इतर 7 जणांची पुणे सत्र न्यायालयाने जमीनीचा बेकायदेशीर
ताबा मारणे, खंडणी, आणि खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी निर्दोष मुक्तता केली. कोंढवा पोलीस ठाण्यात 2016 मध्ये
याबाबत गुन्हा दाखल झाला होता. नायर टोळीने बोत्रा कुटुंबीयांना धमकावून जमीनीचा ताबा घेतला होता.
पोलिसांनी आरोपींना हत्यारासह रंगेहाथ पकडले होते, त्यामुळे या गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार दोन पोलिसही होते.
विशेष म्हणजे या गुन्ह्यात पोलिसांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली होती. परंतु न्यायालयाने साक्षीदारांची साक्ष आणि इतर पुरावे ग्राह्य न धरता 8 जणांची निर्दोष मुक्तता केली.

या प्रकरणात ॲड. सुधिर शहा, ॲड. संतोष भागवत, ॲड. विश्वजीत पाटील. ॲड. राहूल देशमुख, ॲड. सचिन झालटे पाटील, ॲड. विपूल दुशिंग यांनी आरोपींच्या वतीने काम पाहिले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jalgaon Hit & Run Case | ‘हिट अँड रन’ प्रकरणात एकनाथ खडसेंचा मोठा गौप्यस्फोट, त्यावेळी आरोपींच्यासोबत कारमध्ये एक मुलगी होती

PMC Action On Rooftop Hotel In Mohammed Wadi | महंमदवाडीतील बेकायदा रुफटॉप हॉटेल पाडले

Ujani Dam | पुणे, सोलापूरकरांचा घसा कोरडा; उजनी धरण परिसरातील नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा

Porsche Car Accident Pune | पुणे हिट अँड रन प्रकरण : मुलगी 15 फूट हवेत उडाली, आरोपी नशेत; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रम