नवीन वाहतूक नियमांनंतर ‘ड्रंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह’ची संख्या घटली ! बिअर बारचा व्यवसाय 30 ते 40 टक्क्यांनी झाला कमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या देशात मोटर वाहन कायदा लागू झाल्यापासून वाहतूक नियम कठोर करण्यात आले आहे आणि हे नियम मोडणाऱ्यांना भरमसाठ दंड सोसावा लागत आहे. अनेकदा गाडीच्या किंमतीपेक्षा अधिक दंड भरावा लागल्याच्या घटना आहे. त्यामुळे वाहन चालक वैतागले आहेत. त्याचबरोबर सरकारच्या या निर्णयामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात धास्तावले असून या खिसेकापू दंडामुळे धास्तावले असून नागरिक या दंडापासून वाचण्यासाठी मोठ्या प्रमाणात सावधानता बाळगत आहे.
नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, या दंडामुळे बारमध्ये जाऊन दारू पिणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट झाली असून यामुळे बारच्या व्यवसायात 30 ते 40 टक्क्यांची घट झाली आहे.

1 सप्टेंबरनंतर कमी झाली संख्या
दिल्लीतील मयूर विहारमधील एका बारच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबरपासून नवीन नियम लागू झाल्यानंतर येथे येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. याआधी संध्याकाळ होताच याठिकाणी नागरिक दारू पिण्यासाठी येत असतं. मात्र आता मोठ्या प्रमाणात बार खाली राहत असून व्यवसायामध्ये 30 ते 40 टक्क्यांची घसरण आली आहे.

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर 10 हजार रुपये दंड
केंद्र सरकारने नुकतेच मोटार वाहन कायदा लागू केला असून वाहतूक नियम कठोर करण्यात आले आहेत. त्यामुळे दारू पिऊन गाडी चालवण्यापासून ते विविध प्रकारचे नियम मोडणाऱ्या नागरिकांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारण्यात येणार आहे. यामध्ये विना लायसन्स गाडी चालवल्यास 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर वेगापेक्षा जास्त फास्ट गाडी चालविल्याने 2 हजार रुपये दंड तर रॅश ड्रायव्हिंगसाठी 5 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे. तसेच दारू पिऊन गाडी चालवल्यास 10 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like