बार कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्षांची वकिलानेच केली हत्या ; हत्येवरुन पेटले राजकारण

आग्रा : वृत्तसंस्था – दोन दिवसांपूर्वी निवड झालेल्या उत्तर प्रदेश बार कौन्सिलच्या पहिल्या महिला अध्यक्ष अ‍ॅॅड. दरवेश यादव यांची दुसऱ्या एका वकिलाने बुधवारी येथील दिवाणी न्यायालयाच्या आवारातच गोळ्या घालून हत्या केली. नंतर या हल्लेखोर वकिलाने स्वत:वरही गोळी झाडून घेतल्याने त्यालाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या हत्येवरुन आता उत्तर प्रदेशात राजकारण सुरु झाले असून अखिलेश यादव यांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत योगी सरकारवर टिका केली आहे. यादव यांच्या अंत्यसंस्काराला अखिलेश जाणार आहेत. दरवेश यादव यांच्या नातेवाईकांनी या घटनेची सीबीआय चौकशी मागणी केली आहे.

अ‍ॅड. दरवेश यादव यांची दोनच दिवसांपूर्वी राज्य बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानिमित्त अवध बार असोसिएशनतर्फे त्यांचा सत्कार आयोजित केला होता. समारंभ सुरू होण्याआधी अ‍ॅड. यादव या अ‍ॅड. अरविंद कुमार मिश्रा यांच्या कार्यालयात असताना अ‍ॅड. मनीष शर्मा हा वकील तेथे आला व त्याने पिस्तुलातून अ‍ॅड. यादव यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले.

तेथे डॉक्टरांनी यादव यांचा मृत्यु झाल्याचे जाहीर केले. मनीष शर्मा याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.
एटा येथे राहणाऱ्या दरवेश यांनी आग्रा कॉलेजमधून एलएलबी आणि एलएलएम केले होते. त्या २००४ पासून दिवाणी न्यायालयात वकिली करीत होत्या. २०१७ मध्ये त्यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. २०१९ मध्ये त्यांना आणि आणखी एका वकिलांना समसमान मते मिळाली होती. दोघे सहा सहा महिने अध्यक्ष राहणार होते.

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

पाहिल्या पाऊसाचा आनंद घ्या मनसोक्त, बिनधास्त भिजा

‘होम हेल्थ केअर’ची संकल्पना आणखी रूजायला हवी

विद्यार्थ्यांचा शोध, आंब्याच्या पानांपासून तयार केले मद्य

स्मार्टफोनच्या अतिवापराने तुम्हालाही होऊ शकतो ‘नोमोफोबिया’!