बिअरसाठी क्वारंटाईन सेंटरमध्ये बारबालांचा ‘हंगामा’, उतरवले कपडे

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मुंबईहून परतणाऱ्या बार बालांनी मुरदाबादमधील क्वारंटाईन सेंटरमध्ये जोरदार गोंधळ उडवला. या बार बालांनी बिअरची मागणी करत आपल्या तीन वर्षाच्या मुलाला बाल्कनीतून खाली टांगत खाली फेकण्याची धमकी दिली. एवढेच नव्हे तर काही स्त्रिया अर्धनग्न अवस्थेत आल्या म्हणाल्या कि, जर त्यांना बिअर दिली नाही तर ठीक होणार नाही. घटनास्थळी पोहोचलेल्या महिला पोलिसांनी हे प्रकरण कसेबसे शांत केले.

शुक्रवारी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन परिसरातील आदर्श कॉलनीत राहणाऱ्या सुमारे डझनभर बार बाला मुरादाबाद येथे पोहोचल्या. यापैकी पाच महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कुटुंबियांना क्वारंटाईन सेंटरमध्ये पाठविण्याची योजना आखली. त्याअंतर्गत मंगळवारी बार बाला व त्यांच्या परिवारास राम गंगा विहार स्थित एमआयटी कॅम्पसमधील क्वारंटाईन केंद्रात पाठविण्यात आले. सायंकाळी उशिरा मुलींनी बिअरची मागणी करत पोलिसांना हैराण केले. जेव्हा मागणी पूर्ण केली गेली नाही, तेव्हा त्यांनी क्वारंटाईन केंद्रात गोंधळ उडवला.

एएसपी दीपक भुकर म्हणाले की, मुंबईहून आदर्श कॉलनीला येथे आलेल्या 72 लोकांपैकी तीन ते 13 वयोगटातील 12 मुले, 40 महिला आणि 20 पुरुष आहेत. त्यापैकी 20 जणांची मुंबईहून परतल्यानंतर कोरोनाची चाचणी घेण्यात आली. त्यातील पाच कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे, उर्वरित लोकांना मंगळवारी क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले. एएसपीने सांगितले की, सुरुवातीला महिला क्वारंटाईन सेंटरवर जाण्यास तयार नव्हत्या. कसे तरी करून त्यांना आण्यात आले.

यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांनी गोंधळ सुरू केला. या महिलांनी डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांकडून बिअरची मागणी करण्यास सुरवात केली. नकार दिल्यानंतर, एका महिलेने आपल्या तीन वर्षाच्या मुलाला एमआयटी वसतिगृहाच्या बाल्कनीतून खाली लटकवले आणि तिला बीअर दिले नाही तर मुलाला खाली फेकण्याची धमकी दिली. एमआयटीमध्ये मोठ्या प्रमाणात महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, यापैकी उर्वरित 15 निगेटिव्ह व्यक्तींना रात्री उशिरा सर्वांपासून वेगळे एमआयटीच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये हलविण्यात आले.