Coronavirus : मास्क खरेदी करणार्‍यांना अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामांनी केलं ‘आवाहन’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने जगभरात कहर माजवला आहे. चीन, इराण, इटली, अमेरिका, भारत आणि ब्रिटनसह अनेक मोठ्या देशात कोरोनामुळे दहशत माजली आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाची 30 प्रकरणं समोर आली आहेत. या दरम्यान आता अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी देखील कोरोनापासून खबरदारी म्हणून मास्क लावण्याचे आवाहन केले आहे.

काही लोकांचे हे देखील म्हणणे आहे की कोरोनाला फक्त मास्क लावून रोखता येणार नाही. ओबामा यांनी देखील असेच काही आवाहन केले आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणले की कोरोनापासून स्वत:चे रक्षण करा. यासाठी काही साधारण काळजी घेण्याची आवश्यकता आहे. घरात रहा, योग्य वेळी हात स्वच्छ धुवा. मास्क रुग्णांची देखभाल करणाऱ्या हॉस्पिटलमधील सेवकांसाठी वाचवून ठेवा. शांत रहा. तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि विज्ञानाला फॉलो करा.

ओबामा यांच्या ट्विटनंतर आता याची चर्चा सुरु झाली आहे की कोरोनापासून वाचण्यासाठी फक्त मास्क पुरेसं नाही. कारण कोरोनामुळे ग्रस्त अनेक देशात मास्कची कमतरता जाणवत असल्याचे सांगितले जात आहे आणि अनेक देशात जे काही मास्क आहेत ते अत्यंत महाग विकले जात आहेत.

एका वृत्तानुसार ब्रिटनमध्ये तर एका कंपनीने मास्कची एक खोटी जाहिरात दिली ज्यानंतर सरकारकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. तेथे मास्क तयार करणाऱ्या दोन कंपन्यांना बॅन केले आहे.

दिल्लीत हॅंड सॅनिटायझर आणि मास्कची कमतरता –
भारतात कोरोनापासून वाचण्यासाठी लोक सॅनिटायझर आणि मास्कची खरेदी करत आहेत. राजधानी दिल्लीत याची मागणी वाढल्याने मेडिकल स्टोरमध्ये याची कमतरता जाणवायला लागली आहे. अनेक ठिकाणी तर हे मास्क, सॅनिटायझर महागले आहेत.

भारतात आतापर्यंत 30 प्रकरणं समोर आली आहेत, ज्यातील तीनवर उपचार झाला आहे. अद्याप 26 प्रकरणं पॉजिटिव्ह आहेत. त्यामुळे भारतात सतर्कता वाढली आहे. भारत सरकारने दिल्लीसह अन्य शहरात लॅबची व्यवस्था करण्यात येईल.

आरोग्य मंत्र्यांच्या मते, सरकार कोरोनाशी लढण्यासाठी तयार असल्याचे सांगताना ते म्हणाले, 15 लॅबोरेटरी यापूर्वी तयार ठेवण्यात आल्या होत्या. आता 19 आणखी नव्या लॅबोरेटरी तयार केला गेल्या आहेत. दिल्ली सरकारला डॉक्टरांची टीम तयार करण्यास सांगण्यात आले आहे ज्याने कोरोनाचा प्रसार रोखता येईल.

दिल्लीच्या रुग्णालयात 250 पेक्षा अधिक खाटा कोरोना व्हायरस रुग्णांसाठी रिझर्व ठेवण्यात आल्या आहेत. दिल्ली सरकारने कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी एका टास्क फोर्सचे गठन केले आहे.