बारामतीतील ‘या’ पोस्टरची राज्यभर चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणूकीचे निकाल 24 ऑक्टोबरला लागले. बारामती विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तब्बल 1 लाख 65 हजारांपेक्षा जास्त मताधिक्क्यानं विजय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बारामती मतदार संघात सभा घेतली होती. असं असताना देखील अजित पवारांनी समोरील सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यानंतर आता बारामतीमध्ये पोस्टरबाजीला उधाण आलं आहे. आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल असे पोस्टर्स बारामतीमध्ये लावण्यात आले असून त्या पोस्टर्सची राज्यभर चर्चा आहे.

वंचितमधून भाजपामध्ये गेलेल्या आणि मुख्यमंत्र्यांनी ढाण्या वाघ संबोधलेल्या गोपीचंद पडळकर यांना बारामती विधानसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली होती. बारामतीची निवडणुक भाजपाकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. मात्र, अजित पवारांनी तब्बल 1 लाख 65 हजार 265 मतांचं मताधिक्क्य घेवुन विजय संपादन केला. पवारांसमोरील सर्वच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यानंतर आता बारामतीमध्ये आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल असे पोस्टर्स लागले आहेत. त्याची चर्चा राज्यभर होत आहे.

Visit : Policenama.com