बारामती : पोलीस व्हॅनवर जमावाची दगडफेक; एक पोलीस जखमी

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन

बारामती तालुक्यातील शिरष्णे येथे ग्रामस्थ आणि रेशन दुकानदार यांच्यामध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत होऊन गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. हा वाद रेशनकार्ड व्हेरीफाय करण्यावरुन झाला. गावामध्ये वाद झाल्याने पोलिसांचे एक पथक गावात दाखल झाले होते. परंतू संतपप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या व्हॅनवर दगडफेक केली. या दगडफेकीत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. या घटनेमुळे तणाव निर्माण झाला असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही गटाबरोबरच पोलिसांनीही फिर्याद दिली असून, वडगाव निंबाळकर पोलिसांनी ५७ जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
[amazon_link asins=’B07DX1K7CT’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5239a44e-8466-11e8-af2a-73407af52ebd’]

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शरद बाबुराव वेताळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २४ मोटारसायकलच्या चालक-मालकांविरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शंकर खलाटे यास अमोल दोशी यांच्या किराणा स्टोअर्स या दुकानात कोंडून ठेवले आहे. तुम्ही तेथील सहकाऱ्यांसह घटनास्थळी या, असा निरोप सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास बडवे यांनी वेताळ यांना दिला. त्यानुसार सहाय्यक फौजदार जाधव हे तेथे पुढे गेले.

वेताळ यांच्या कारमधून पोलिसनाईक विठ्ठल कदम, ज्ञानेश्वर सानप, खांडेकर हे सव्वा आठच्या सुमारास तेथे पोहोचले. पांढरवस्ती चौकातील दोशी यांचे दुकानासमोर जमाव दिसला. हवालदार रावसाहेब गायकवाड, पोलिस नाईक प्रदीप काळे व होमगार्ड येथील जमावाला जमावबंदी आदेश असून तुम्ही गोंधळ घालू नका असे आवाहन करून जमाव पांगवू लागले. यावेळी दुकानामध्ये लपलेल्या शंकर खलाटे, वैभव खलाटे, विशाल खलाटे यांना जमावाच्या ताब्यातून वाचविण्याचे काम पोलिसांकडून सुरु असताना जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत पोलीस व्हॅनवर दगडफेक केली.
[amazon_link asins=’B0785JJF7L’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’65dd4252-8466-11e8-9205-4beff3405e08′]