बारामतीमध्ये अल्पवयीन मुलीवर खुनीहल्ला ; तोंडावर वार करून चेहरा केला विद्रुप

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – एका खून प्रकरणात आरोपी असलेल्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याचा प्रयत्न बारामतीमध्ये सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडला. हल्लेखोराने तिच्या चेहऱ्यावर वार करुन तो विद्रुप करण्याचा प्रयत्न केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचार करण्यात आले.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही मुलगी कृष्णा जाधव खून प्रकरणात आरोपी आहे. सोमवारी रात्री ही मुलगी शहरातील सांस्कृतिक भवनासमोरून निघाली होती. या वेळी अचानक आलेल्या हल्लेखोराने धारदार शस्त्राने तिच्यावर हल्ला चढविला. त्यांनतर हल्लेखोर पसार झाला. याबाबत माहिती मिळाल्याने पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहचले. घटनास्थळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

पोलिसांनी तातडीने जखमी अल्पवयीन मुलीला सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचारासाठी हलविले. तिच्या चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. त्यामुळे चेहरा विद्रूप झाला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी रुग्णालयात जखमी मुलीची भेट घेतली.

आरोग्यविषयक वृत्त –
या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

रात्री तुळशीची पाने टाकून दूध घ्या, होतील हे फायदे

#YogaDay2019 : मनशांतीसाठी योगासन हा सर्वात चांगला पर्याय

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार