Baramati Crime News । ‘उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निकटवर्तीयावर गोळीबार, माळेगावच्या माजी सरपंचाला अटक

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – माळेगाव-पणदरे (Malegaon-Pandare) येथील जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी तावरे (Rohini Taware) यांचे पती राष्ट्रवादीचे युवा नेते रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावर गोळीबार (Firing) करण्यात आली आहे. ही घटना बारामती (Baramati) तालुक्यात घडली आहे. मुख्यतः म्हणजे रविराज तावरे हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहे. तावरे यांच्यावर झालेल्या गोळीबारामुळे बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपींना चिथावणी दिल्याच्या कारणावरून पोलिसांकडून माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना सोमवारी (5 जुलै) रोजी रात्री अटक करण्यात आलीय.

Nitesh Rane | तालिका अध्यक्षाच्या खुर्चीचा अपमान या सोंगाड्याने केला, नितेश राणेंची भास्कर जाधव यांच्यावर जहरी टीका

Baramati Crime News | ajit pawar baramati’s close person raviraj taware shooting case malegaon sarpanch jaideep dilip taware

याबाबत अधिक माहिती अशी की, 31 मे रोजी सायंकाळी पावणे सात वाजता रविराज तावरे (Raviraj Taware) यांच्यावर माळेगावात मोरे टोळीने गोळीबार करत प्राणघातक हल्ला केला होता. तावरे हे पत्नीसह वडापाव घेवून मोटारीकडे येत असताना त्यांच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. यावरून रोहिणी रविराज तावरे यांनी तक्रार दिली होती. या प्रकरणी पोलिसांना घटनेनंतरच 5 तासातच आरोपींना जेरबंद करण्यात यश आले होते.

Paramvir Singh | पोलिस उपअधीक्षक निपुंगेंचा परमबीर सिंग यांच्यावर आरोप, म्हणाले – ‘महिला पोलिसाच्या खुनाच्या गुन्हयात मुंबईच्या माजी पोलिस आयुक्तांनीच अडकवलं’

जिल्हा परिषद (Zilla Parishad) सदस्य पदाद्वारे केलेल्या विकासकामांचा राग मनात धरून फिर्यादी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याचा प्रयत्न मोरे टोळीकडून केला जात होता. म्हणून राजकिय व आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने रविराज यांना संपवून दहशत माजविण्यासाठी कट रचून अल्पवयीन मुलामार्फत खूनी हल्ला केला गेला. पोलिसांनी प्राणघातक हल्ल्यासह शस्त्र अधिनियम 120 ब आदी कलमांनुसार मोरे टोळीवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात गंभीर जखमी झालेल्या रविराज यांचा पोलिसांनी रुग्णालयात जात जबाब घेतला होता.

Atul Bhatkhalkar | ‘वसूली सरकारने या घाणेरड्या खेळाची सुरुवात केली शेवट आम्ही करू’ (व्हिडीओ)

दरम्यान, गोळीबार केल्याच्या गुन्ह्यात आरोपींना चिथावणी दिल्याच्या कारणावरून बारामती तालुका
पोलिसांनी माजी सरपंच जयदीप दिलीप तावरे यांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली. तेथील
पीआय महेश ढवाण (PI Mahesh Dhawan) यांनी ही माहिती दिली आहे. या दरम्यान, यापूर्वी
प्रशांत पोपटराव मोरे (वय 47, रा. शिवनगर, माळेगाव), विनोद उर्फ टॉम पोपटराव मोरे आणि राहुल
उर्फ रिबल कृष्णांत यादव आणि एका अल्पवयीनावर मोक्कांतर्गत कारवाई झाली असून हे चौघेही
अटकेत आहेत. यातील अल्पवयीन मुलगा बालसुधारगृहात दाखल आहे.

 ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Baramati Crime News | ajit pawar baramati’s close person raviraj taware shooting case malegaon sarpanch jaideep dilip taware

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update