बारामती : राष्ट्रवादीचे नेते रविराज तावरेंवर हल्ला कसा झाला ? इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांचे पती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवानेते रविराज सदाशिवराव तावरे (वय-40) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना बारामती Baramati तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथे घडली आहे. हा प्रकार सोमवारी (दि. 31) सायंकाळी घडला. तावरे यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. गोळीबाराच्या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर तावरे यांना तातडीने बारामती Baramati शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Pune : Lockdown काळात सेक्सटॉर्शनच्या तक्रारीत वाढ; तब्बल 150 जणांना ‘तसलं’ चॅट करणं आलं अंगलट

नेमकं काय घडलं ?
रविराज तावरे हे त्यांची पत्नी आणि जिल्हा परिषद सदस्या रोहिणी तावरे यांच्या समवेत सायंकाळी पावणे सातच्या सुमारास संभाजीनगर येथे वडापाव आणण्यासाठी गेले होते. यावेळी वडापाव घेऊन गाडीकडे येत असताना अचानक दुचाकीवरुन आलेल्या दोघाजणांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर तावरे खाली कोसळले. तर गाडीमध्ये बसलेल्या त्यांच्या पत्नीला अचानक झालेल्या हल्ल्यामुळे धक्का बसला. यातूनही त्यांनी स्वतःला सावरत आरडाओरडा केला. त्यामुळे परिसरात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी त्यांच्या दिशेने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत हल्लेखोर गोळीबार करुन फरार झाले.

तावरे अजित पवारांचे निकटवर्तीय
जखमी रविराज तावरे हे माळेगाव परिसरातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांमध्ये त्यांची गणना होते. रविराज तावरे हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. माळेगावातील राजकीय घडामोडीत रविराज यांची भूमिका निर्णायक ठरते. माळेगावची ग्रामपंचायत रद्द होऊन नुकतीच नगरपंचायत झाली. येत्या काही काळात नगरपंचायत निवडणूक होणार आहे. गावपातळीवरील राजकारणातून हा प्रकार झाला असावा असा संशय व्यक्त होत आहे.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक घटनास्थळी
घटना घडल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच रुग्णालयात जाऊन रविराज तावरे यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. या प्रकरणातील आरोपींना लवकच ताब्यात घेतले जाईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सांगितले.

अजित पवारांच्या पोलिस यंत्रणेला सूचना
या घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस आणि वैद्यकीय यंत्रणेशी संपर्क साधत सूचना दिल्या. या घटनेनंतर माळेगावमधील वातावरण तणावपूर्ण बनले असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रविराज तावरे यांच्यावर बारामतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एकूणच बारामतीच्या इतिहासात पहिल्यांदाच एका राजकीय नेत्यावर हल्ला होण्याची घटना घडली आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. या प्रकरणाचा मास्टरमाईंड कोण आहे याचा शोध पोलिस घेत आहेत.

READ ALSO THIS :

खुशखबर ! 18 ते 40 वर्षे वयोगटातील 10 वी पास उमेदवारांना पोस्टाच्या महाराष्ट्र विभागात नोकरीची सुवर्णसंधी, मुलाखतीविना 2428 पदांसाठी भरती; जाणून घ्या प्रक्रिया

 

लाल, गोड टरबूज ओळखण्याच्या अनोख्या युक्त्या; तात्काळ समजेल फळाच्या आतमधील परिस्थितीबाबत, जाणून घ्या

2013 च्या पोलीस उपनिरीक्षक अहर्ता परिक्षेतील 619 अंमलदारांना PSI पदी बढती

 

सकाळी उठल्यानंतर दररोज बडीशेपचे पाणी प्या, नक्की वजन होईल कमी; जाणून घ्या पाणी पिण्याची पध्दत