Baramati Crime | अजित पवार, सुप्रिया सुळेंशी ओळख असल्याचे सांगत डॉक्टरने केली शिक्षिकेची 10 लाखांची फसवणूक

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – Baramati Crime | एका अपंग शिक्षिकेच्या फसवणुकीप्रकरणी डॉ. कृष्णा शेषराव जेवादे आणि सोमनाथ इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, तत्कालीन शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी आमची ओळख असल्याचे सांगून या दोघांनी स्मिता विश्राम वाघोले या अपंग शिक्षिकेची फसवणूक केली. (Baramati Crime)

 

स्मिता विश्राम वाघोले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या २००१ पासून पुणे महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात. त्या गुडघेदुखीवरील उपचारासाठी बारामतीतील विश्वजित हॉस्पिटल येथे २०२१ साली आल्या होत्या. तिथे डॉ. कृष्णा जेवादे आणि त्यांचा कंपाउंडर सोमनाथ इंगळे यांच्याशी वाघोलेंची ओळख झाली.

 

डॉ. जेवादे यांनी त्यावेळी वाघोलेंची विचारपूस केली असता, वाघोले अस्थिव्यंग असल्याचे डॉ. जेवादे यांना समजले. त्यानंतर तुम्ही अस्थिव्यंग असताना तुम्हाला शिक्षणप्रमुखपदी पदोन्नती कशी मिळाली नाही, असा प्रश्न त्यांनी वाघोलेंना विचारला. पुढे त्यांची ओळख तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी असल्याचे सांगितले. तसेच विश्वास संपादन करण्यासाठी त्या नेत्यांबरोबरचा फोटोही दाखवला. (Baramati Crime)

दरम्यान, वाघोले यांना पदोन्नतीचे आमिष दाखवले आणि त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने १० लाख रुपये उकळले.
पैसे देऊन बराच कालावधी लोटला तरी काम होत नसल्याने फिर्यादी यांनी त्यांना फोनवर संपर्क केला असता,
जेवादे त्यांना उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पुढे त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गुन्हा दाखल केला.

 

Web Title :- Baramati Crime | using the name of ajit pawar, supriya sule varsha gaikwad defrauded a disabled teacher of rs 10 lakh for promotion

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Virat Kohli | विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम; ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिला क्रिकेटर

Shweta Tiwari | श्वेता तिवारीने ‘तो’ फोटो शेअर करताच नेटकरी संतापले; म्हणाले लाज वाटते का…..

Nora Fatehi | अभिमानास्पद! ‘फिफा वर्ल्ड कप’मध्ये नोरा फतेहीने फडकावला भारताचा तिरंगा; सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव

Jalgaon News | …आणि शेतकऱ्यांना सावकाराच्या ताब्यातील मिळाली १०० एकर जमीन माघारी; जळगावच्या अधिकाऱ्याच्या तत्परतेने १५ कुटुंबांना न्याय