माळेगाव कारखाना, शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे अध्यक्ष रंजन तावरे, सचिव खैरे यांच्यावर 51 लाख 30 हजाराच्या अपहाराचा गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्था तसेच माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे आणि सचिव नंदकुमार खैरे यांनी 51 लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात कारखान्याचे संचालक सुरेश खलाटे (रा. कांबळेश्वर, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रंजन तावरे व सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2011 मध्ये पतसंस्थेचे अध्यक्ष आणि सचिव खैरे यांनी संगनमत करून फिर्यादी खलाटे व रामदास आटोळे तसेच राजेंद्र बुरूंगळे या तिघांकडून कर्ज मागणी प्रकरणावर स्वाक्षर्‍या घेतल्या. त्यानंतर धनादेशवरही स्वाक्षर्‍या घेतल्या गेल्या. त्यानंतर प्रत्येकी 17 लाख 10 हजार रुपये असे एकूण 51 लाख 30 हजार रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे दाखविले. तसेच, 51 लाख 30 हजाराची रक्कम बेरर धनादेशाव्दारे काढली आहे.

याबाबत फिर्यादींनी सहाय्यक निबंधक यांच्याकडे तक्रार केली होती. त्याची चौकशी बारामती सहाय्यक निबंधक यांच्याकडून करण्यात आली. चौकशीत हा प्रकार समोर आला. त्यानुसार, रंजन तावरे व खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजकीय आकसापोटी प्रकार…
रंजन तावरे यांना याबाबत विचारले असता त्यांनी हा प्रकार जुना असून, माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय आकासापोटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्जप्रकरण संबंधितांना माहिती होते. अपहराची चौकशीची मागणी 2019 मध्ये करण्यात आली. चौकशी होऊन कर्जदारांना थकबाकीपोटी 101 ची नोटीसही बजावण्याचा दाखला सहकार निबंधकांनी शरद पतसंस्थेला दिला आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/