आत्महत्या रोखण्यासाठी बारामतीकरांचा पुढाकार 

बारामती : पोलीसनामा ऑनलाईन

राज्यभरात मराठा समाज आंदोलन आधिकच आक्रमक झाले आहेत. या आंदोलनादरम्यान औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यू नंतर राज्यातील विविध ठिकाणी जवळपास दहा ते बारा जणांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. याच  पार्श्वभूमीवर बारामती येथील मराठा कार्यकर्त्यांनी आत्महत्या रोखण्याकरिता महत्वाचे पाऊल उचलले आहे. बारामती ते मुंबई अशा ‘मराठा संवाद यात्रे ‘चे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून समाजात जनजागृती करण्यासह सामाजीक एकोपा राहावा याकरिता प्रयत्न केले जाणार आहेत.
[amazon_link asins=’B00KNOW2SQ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’aaf92be1-97f8-11e8-a26f-d33e9eb92644′]

याबाबत मिळालेलीच अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीकरिता मराठा समाज  रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागला आहे.आरक्षणाच्या मागणीकरिता राज्यातील काही जणांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. या पार्श्वभूमीवर बारामतीतील नाना सातव व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘मराठा संवाद यात्रा’ या उपक्रमाचे  आयोजन केले  आहे. ही यात्रा बारामतीत सुरु होऊन मुंबईत संपणार आहे. या यात्रेदरम्यान वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन मराठा समाजात जनजागृती करुन त्यांना आत्महत्या आणि हिंसक आंदोलनापासून परावृत्त केले  जाणार आहे.

मराठा समाजाने आतापर्यंत ५८ मोर्चे शांततेत पार पाडले मात्र यावर्षी या आंदोलनाला गालबोट लागले . त्यामुळे यापुढील काळात समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी व सलोखा कायम राहावा यासाठी सर्वच घटकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने संवाद रथाच्या माध्यमातून ५ ते ९ ऑगस्ट दरम्यान बारामती ते मुंबई अशी मराठा संवाद यात्रा आयोजित केली असल्याचं नाना सातव यांनी सांगितले.