Baramati Lok Sabha | बारामतीसह 11 मतदारसंघात प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Baramati Lok Sabha | महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांच्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज (रविवार) सायंकाळी सहा वाजता थंडावणार आहेत. त्यामध्ये राज्यासह देशाचे लक्ष लागलेल्या हाय व्होल्टेज लढत बारामती मतदारसंघात होत असून याठिकाणचा देखील प्रचार आज थंडावणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार (Pawar Vs Pawar) असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

मंगळवारी (दि. 7 मे) तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघात मतदान होणार आहे. 48 तास आधी म्हणजे आज रविवारी सायंकाळी प्रचाराची सांगता होणार आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी रायगड (Raigad Lok Sabha), बारामती, धाराशिव (Dharashiv Lok Sabha), लातूर (Latur Lok Sabha), सोलापूर (Solapur Lok Sabha), माढा (Madha Lok Sabha), सांगली (Sangli Lok Sabha), सातारा (Satara Lok Sabha), रत्नागिरी-सिंधुदुर्ग (Ratnagiri Sindhudurg Lok Sabha), कोल्हापूर (Kolhapur Lok Sabha), हातकणंगले (Hatkanangale Lok Sabha) या लोकसभेच्या 11 मतदारसंघात मंगळवारी मतदान पार पडणार आहे.

महाराष्ट्रात 48 जागा असून या जागांवर महायुती व महाविकास आघीडीने आपले उमेदवार उभे केले आहेत. महायुतीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) तर महाविकास आघाडीकडून ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), राहुल गांधी (Rahul Gandhi), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), संजय राऊत (Sanjay Raut), आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी सभा घेऊन तिसरा टप्पा गाजवला.

50 वर्षांनी शरद पवारांनी सभेचं मैदान बदललं

बारामती लोकसभा मतदार संघात पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे.
त्यामुळे या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे.
बारामतीमध्ये आजपर्यंत राष्ट्रवादीच्या उमेतवारांच्या प्रचाराची सांगता ही मिशन हायस्कुल मैदानावरील सभेने होत होती.
मात्र, यंदा पहिल्यांदाच ही जागा अजित पवार यांनी मिळवली आहे.
त्यामुळे सुनेत्रा पवार यांची सांगता सभा याठिकाणी होईल.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Congress Bhavan | महिला सुरक्षेसाठी मोदी सरकार हटवावेच लागेल; सामाजिक संस्थांच्या महिला कार्यकर्त्यांचे मत