Baramati Lok Sabha Election 2024 | अजितदादांचा डमी अर्ज नामंजूर, बारामतीमध्ये नणंद विरूद्ध भावजयी अशीच लढत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला, त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील खबरदारी म्हणून डमी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावरून अनेकांनी बारामती मतरदार संघात वेगळे काहीतरी धक्कातंत्र घडू शकते, अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, या शक्यतेला पूर्णविराम मिळाला आहे. कारण, काहीतरी चुकीमुळे अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज नामंजुर ठरला आहे. त्यामुळे येथे सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरूद्ध सुप्रिया सुळे (Supriya Sule) असाच सामना होणार आहे.(Baramati Lok Sabha Election 2024)

अजित पवारांनी बारामती लोकसभेसाठ भरलेला उमेदवारी अर्ज नामंजुर ठरला आहे. तर सुनेत्रा पवारांचा अर्ज मंजूर झाला आहे. यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे वि. सुनेत्रा पवार अशी लढत होणार आहे.

तर दुसरीकडे, शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंचाही अर्ज मंजूर झाला आहे. तर त्यांच्यासोबत डमी अर्ज भरलेल्या सचिन दोड़के यांचा अर्ज नामंजूर झाला आहे. दोडके यांनी अपक्ष अर्ज भरला होता.

दुसरीकडे शरद राम पवार (Sharad Ram Pawar) या रिक्षाचालकाने देखील अर्ज भरला होता.
त्यांचा अर्जही मंजूर झाला आहे. यामुळे शरद पवार नावाचा उमेदवार बारामतीत असणार आहे.
अजित पवारांच्या पवार नावाला मतदान करण्याच्या आवाहनाला मतदार कसा प्रतिसाद देतात हे मतदानांनंतर दिसेल.

साधारणपणे, डमी अर्ज हा आपल्या जवळील विश्वासू व्यक्तीचा भरला जातो.
अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षाचे प्रमुख असताना त्यांनीच पत्नीसाठी डमी अर्ज भरल्याने
अनेकांना आश्चर्य वाटले होते. मात्र, आता अजित पवारांचा अर्जच नामंजूर झाला आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘पूर्वी आम्ही घास घास घासायचो, इकडे आलो तर…’, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

Amol Kolhe On Ajit Pawar | 23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला चारच जागा मिळतात ही शोकांतिका – डॉ. अमोल कोल्हे (Video)

Minor Girl Rape Case Pune | पुणे : मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Dr Ajay Taware-Sassoon Hospital | ससूनमधील ‘उंदीर’ प्रकरणात अधीक्षक डॉ. अजय तावरेंची उचलबांगडी, तिघांना कारणे दाखवा नोटीस

Vijay Shivtare-Ajit Pawar | शिवतारेंच्या ‘पलटी’ची राज्यात चर्चा, आधी दिली अजित पवारांच्या पराभवाची गॅरंटी, आता म्हणाले ”ते तर कार्यसम्राट!”