Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा निवडणूकीसाठी नियंत्रण कक्ष स्थापन

पुणे : Baramati Lok Sabha Election 2024 | बारामती लोकसभा संघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून नागरिकांना निवडणुकीच्या अनुषंगाने संपर्क साधण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात नियंत्रण कक्षाची (Election Control Room) स्थापना करण्यात आली आहे. (Baramati Lok Sabha Election 2024)

निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय विधानभवन येथील पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीतील तळमजल्यावर सुरू करण्यात आले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी (Kavita Dwivedi IAS) यांचा दूरध्वनी संपर्क क्रमांक ०२०-२९९९१५३८ आणि आचारसंहिता व नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०२०-२९९९२०६८ असा असून नागरिकांनी निवडणूक विषयक माहिती अथवा तक्रारीसाठी वरील क्रमांकावर संपर्क साधावा. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात प्रसिद्धी माध्यमांना माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने माध्यम कक्ष सुरू करण्यात आला असून त्याचा संपर्क क्रमांक ०२०-२९९९२०६६ असा आहे, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती द्विवेदी यांनी कळविले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे : तरुणीचा फोटो वापरुन इंन्स्टाग्रामवर तयार केले फेक अकाउंट, मॉर्फ फोटो व्हायरल करुन विनयभंग

Devendra Fadnavis In Indapur | इंदापुरातील कार्यकर्त्यांना देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन, म्हणाले ”कृतीतून करून दाखवणार हा…”

Pune PMC Water Supply | पुणे मनपाकडून मोफतच पाणीपुरवठा, पैसे मागितल्यास तक्रार करण्याचे प्रशासनाचे आवाहन