Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदार संघातील मतदान यंत्रांची द्वितीय सरमिसळ प्रक्रिया संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी असलेल्या सर्व मतदान यंत्रांची निवडणूक निरीक्षक श्रीमती आनंदी पालानीस्वामी यांच्या उपस्थितीत विधानभवन येथील सभागृहात संगणकीय पद्धतीने मतदान केंद्रनिहाय द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी ( Kavita Dwivedi IAS), समन्वयक अधिकारी हनुमंत आरगुंडे, समिक्षा चंद्राकर, ईव्हीएम व्यवस्थापन समन्वयक अधिकारी रुपाली आवले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, सहायक समन्वयक अधिकारी विजय मुळीक, सुप्रिया डांगे, उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.(Baramati Lok Sabha)

बारामती लोकसभा मतदार संघात एकूण २ हजार ५१६ मतदान केंद्र असून त्यासाठी आवश्यक ९ हजार ५८ बॅलेट युनिट,
३ हजार ५६९ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८२५ व्हीव्हीपॅट यंत्रांची सरमिसळ संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आली.
या यंत्रांपैकी सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्राच्या १२० टक्के बॅलेट आणि १४१ टक्के कंट्रोल युनिट,
तर १५२ टक्के व्हीव्हीपॅट यंत्र देण्यात येणार आहेत. तत्पूर्वी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना सरमिसळ प्रक्रीयेची माहिती
देण्यात आली. वितरणानंतर ही यंत्रे संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूममध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी स्तरावर ५ एप्रिल रोजी मतदान यंत्रांच्या प्रथमस्तरीय सरमिसळनंतर बारामती लोकसभा मतदार
संघासाठी ३ हजार ५६९ बॅलेट युनिट, ३ हजार ५६९ कंट्रोल युनिट आणि ३ हजार ८२५ व्हीव्हीपॅट यंत्र वितरित करण्यात
आले आहेत.

बारामती लोकसभा संघात ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने आणि नोटाचा पर्याय लक्षात घेता या मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रत्येकी तीन बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे.
त्यानुसार २३ एप्रिल रोजी पूरवणी सरमिसळ प्रक्रीयेद्वोर आवश्यक बॅलेट युनिट वितरीत करण्यात आले आहेत.
सर्व मतदान यंत्रांची राजकीय पक्षांच्या उपस्थितीत प्रथमस्तरीय तपासणी पूर्ण करण्यात आली असून ते सुस्थितीत आहेत,
असे श्रीमती द्विवेदी यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sunanda Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत शेवटच्या दोन दिवसात धनशक्तीचा वापर होईल, सुनंदा पवार यांचा मोठा दावा

Devendra Fadnavis On Sharad Pawar NCP | राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यावरून फडणवीसांची पवारांवर टीका, 542 पैकी 10 जागा लढवणाऱ्यांच्या आश्वासनांवर विश्वास कोण ठेवणार

Ajit Pawar Break Traffic Rules In Pune | पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तोडले वाहतुकीचे नियम, ताफा उलट्या दिशेने सुसाट, वाहतूक पोलिसांची बघ्याची भूमिका (Video)

Ravindra Dhangekar On BJP | भाजपचाच देशभरातील महिलांच्या ‘मंगळसूत्रा’वर डोळा ! काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे भाजपवर टीकास्त्र