Baramati Lok Sabha | शरद पवार यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर नानासाहेब नवलेंकडून सुनेत्रा पवारांचे कौतुक, ”तूच सर्वात बेस्ट सून”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Baramati Lok Sabha | बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी मुळशी तालुक्यातील (Mulshi Taluka) प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने ताथवडे (Tathawade) येथे माजी खासदार नानासाहेब नवले (Nanasaheb Navle) यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी सुनेत्रा पवार यांनी घरात पाय ठेवताच ‘यु आर वन ऑफ द बेस्ट डॉटर इन लॉ’, असे म्हणत नवले यांनी त्यांची प्रशंसा केली. यावेळी सुनेत्रा पवारांनी नवले यांना नमस्कार करून विनम्रपणे, निशब्दपणे त्यांनी केलेल्या प्रशंसेचा स्वीकार केला.

मूळ पवार आणि बाहेरुन आलेले पवार असे दोन पवार असल्याचे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. पवारांच्या या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती. यानंतर नानासाहेब नवले यांनी हे वक्तव्य पवारांच्या वक्तव्याच्या अनुषंगानेच केल्याचे बोलले जात आहे.

नानासाहेब नवले हे शरद पवारांचे (Sharad Pawar) एकेकाळचे सहकारी आहेत.
मात्र, काही दिवसांपूर्वी सुनेत्रा पवार यांनी नानासाहेब नवले यांची त्यांच्या पुण्याच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती. त्यावेळी नानासाहेब नवले यांनी आपला पाठिंबा सुनेत्रा पवार यांना जाहीर केला होता.

ताथवडे येथील नानासाहेब नवले यांनी घरी आलेल्या सुनेत्रा पवारांना यांना, तू सर्वात बेस्ट सून आहेस, असे म्हटले.
यानंतर खूप आग्रह करून सुनेत्रा पवारांना जेऊ घातले होते. नवलेंच्या या भेटीची आणि वक्तव्याची चर्चा सध्या सुरू आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यास तुमचे राजकीय करिअर धोक्यात येईल का? अजित पवार म्हणाले…

Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी मुरलीधर मोहोळ गुरुवारी भरणार अर्ज ! मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, जंगी रॅली, भव्य सभा घेणार