बारामतीतील बॉण्ड टोळीवर पोलिसांकडून मोक्का

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – व्यापाऱ्यांकडून खंडणी उकळणाऱ्या बॉण्ड टोळीविरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली आहे. अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.

टोळीचा प्रमुख संतोष उर्फ बॉण्ड दत्तात्रय अडागळे (वय १९), विशाल अप्पा मांढरे (वय १९), गणेश सत्यवान लांडगे (वय २०, तिघेही रा. तांदुळवाडी, बारामती) अशी कारवाई कऱण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत.

छोट्या व्यापाऱ्यांकडून उकळत होते खंडणी

बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आकाश किसन पाळेकर या आईस्क्रिम स्टॉलवर येत त्यांनी खंडणी मागितली होती. खंडणी दिली नसल्याने त्यांना कोयत्याने मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच आईस्क्रिमचे दोन बॉक्स आणि गल्ल्यातील रोख रक्कम त्यांनी लंपास केली होती.

तिघांविरोधात गंभीर गुन्हे

मोक्का कारवाई करण्यात आलेल्या

मोक्का कारवाई करण्यात आलेल्या तिघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात दरोडा, सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी कर्मचाऱ्याला मारहाण करणे, जबरी चोरी, मारहाण असे सहा गुन्हे दाखल आहेत.

मोक्काचा प्रस्ताव

या टोळीविरोधात गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांच्याविरोधात मोक्कांतर्गत कारवाई कऱण्याचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक संदिप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून तो विशेष पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्याला मंगळवारी मान्यता देण्यात आली.

पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, कर्मचारी सुरेश भोई, भानुदास बंडगर, राजेंद्र जाधव, अजिनाथ बनसोडे, सारिका जाधव, पोपट कवितके, नंदू जाधव, ह्रदयनाथ देवकर यांच्या पथकाने हा प्रस्ताव तयार केला.

आतापर्यंत ९ टोळ्यांतील ७६ आरोपींवर मोक्काची कारवाई

गेल्या वर्षभरात बारामती उपविभागातील गुन्हागीर पोलिसांनी मोडित काढली आहे. मोक्का कारवाईचे सत्र सुरु आहे. पोलिसांनी आतापर्यंत ९ टोळ्यांतील ७६ आरोपींवर कारवाई केली असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिली.

सिने जगत – 

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिका धक्‍कादायक वळणावर ; ‘चालतय की’ म्हणणारा राणा’दा’ ची ‘एक्झिट’

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची बहिण त्याबाबतीत तिच्या पेक्षाही एकदम ‘फिट’,फोटो व्हायरल

सावधान ! तुमच्या ‘या’ सवयी संपवू शकतात तुमचे ‘वैवाहिक’ जीवन